गुजरातचा फरार अट्टल गुन्हेगार एलसीबीच्या जाळयात

On: September 19, 2025 7:12 PM

जळगाव – गुजरात राज्यात विविध गुन्हे दाखल असलेल्या फरार अट्टल गुन्हेगारास जळगाव एलसीबीच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहेत. साहील उर्फ सलीम पठान असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव असून त्याला गुजरात पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुजरात राज्याच्या सुरत येथील निझर पोलिस स्टेशनकडून समजलेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालय चौफुलीनजीक ही कारवाई केली. अटकेतील साहिल याच्याविरुद्ध गुजरात राज्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुजरात पोलिसांना तो हवा होता.

पोलीस निरिक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक शरद बागल, श्रेणी उप निरीक्षक रवी नरवाडे, पोहेकॉ गोपाल गव्हाळे, पोहेकॉ उमाकांत पाटील, पोलिस नाईक विकास सातदिवे, पोकॉ प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment