जळगाव – जळगाव शहरातील महाबळ कॉलनी आणि आदर्श नगर या परिसरातून बांधकाम साहित्य चोरी करणाऱ्या दोघा महिलांना रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. पोलीस कोठडी दरम्यान त्यांनी चोरी केलेल्या 70 हजार रुपये किमतीच्या साहित्यापैकी 40 हजार रुपये किमतीचे बांधकाम साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
या घटने प्रकरणी बांधकाम ठेकेदार किरण जगन्नाथ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रामानंदनगर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. अटकेतील दोघा महिलांनी आपला गुन्हा कबुल केला आहे.
पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सचीन रणशेवरे, हे कॉ सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपुत, सुशील चौधरी, जितेंद्र राठोड, विनोद सुर्यवंशी, योगेश बारी, हेमंत कळसकर, मनोज सुरवाडे, रेवानंद साळुंखे, गोविंदा पाटील, अतुल चौधरी आदींनी या गुन्ह्याच्या तपासताना सहभाग घेतला. पुढील तपास पो ना विनोद सुर्यवंशी करत आहेत.






