साठ हजार रुपयांचा अंमली पदार्थ हस्तगत – दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

On: September 21, 2025 9:24 PM

जळगाव : साठ हजार रुपये किमतीचा सहा ग्रॅम वजनाचा एम्फेटामाईन सदृश अंमली पदार्थ जळगाव एलसीबी आणि एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने एका जणाकडून जे.के. पार्क परिसरातून हस्तगत केला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहमुद हनीफ पटेल (रा. मेहरुण – जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अटकेतील मेहमुद पटेल याने त्याच्या कब्जातील अंमली पदार्थ त्याचा साथीदार अरमान चिंधा पटेल (रा. शेरा चौक मेहरुण – जळगाव) याच्याकडून विक्रीसाठी आणला होता.

मेहमुद हनीफ पटेल हा त्याच्याजवळ असलेला अंमली पदार्थ जे.के.पार्क परिसरातील स्विमींग पुलाजवळ विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती हे.कॉ.अकरम शेख यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे एलसीबी आणि एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने कारवाई करुन दोघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मेहमुद यास अटक करण्यात आली आहे.     

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड, सपोनि गणेश वाघ, एलसीबीचे पोलिस उप निरीक्षक शरद बागल,  सहायक फौजदार अतुल वंजारी, हे.कॉ. अकरम शेख विजय पाटील, प्रविण भालेराव, सलीम तडवी, पोना किशोर पाटील, पोकॉ गोपाल पाटील, रविंद्र कापडणे, सिध्देश्वर डापकर, रविंद्र चौधरी, महेश सोमवंशी आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके,  पोकॉ योगेश घुगे करत आहेत. दोन आठवड्यांपुर्वी गुजरात पोलिसांना हवा असलेला अंमली पदार्थाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी नाझीम रशीद कुरेशी याला देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करुन त्याला सुरत सिटी क्राईम ब्रॅंचच्या ताब्यात दिले आहे.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment