जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): डॉ. मधुबाला तुझे शुज काढ, मला तुझे गोरे पाय बघायचे आहेत. तुझ्या अंगावरील तिळ मला खुप घायाळ करतो. लोक तुझ्याकडे वाईट नजरेने बघतात, तु माझ्या कॅबीनमधे बसून कामकाज कर. अशा प्रकारचे अश्लिल संवाद साधून आपण किती फाजील आहोत हे डॉ. विजय घोलप आपल्या सहकारी महिला डॉक्टरला दाखवून देण्याचा प्रयत्न करत होते. प्रमुख वैद्यकीय अधिकारी असल्याचा गैरफायदा डॉ. विजय पंडीत घोलप घेत होते. डॉ. घोलप हे सिनीअर डॉक्टर असल्यामुळे त्यांच्या पदाचा मान डॉ. मधुबाला यांच्याकडून ठेवला जात होता. मात्र डॉ. घोलप हे सहकारी डॉ. मधुबालाचा छळ करण्याची संधी सोडत नव्हते. जळगाव शहरातील डॉ. घोलप यांचे काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊया….

डॉ. विजय पंडीत घोलप हे जळगाव शहर महानगरपालिका संचलीत दवाखान्यात प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्याच दवाखान्यात डॉ. मधुबाला (काल्पनिक नाव) या त्यांच्या सहकारी महिला डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. छोट्या पडद्यावरील साबणाच्या जाहीरातीत दिसणा-या मॉडेलप्रमाणे डॉ. मधुबाला यांचे नितळ सौंदर्य कुणाच्याही नजरेत सहज भरत होते. त्याला डॉ. विजय घोलप हे देखील अपवाद नव्हते. डॉ. विजय घोलप हे सहकारी महिला डॉ. मधुबाला यांच्या एकतर्फी प्रेमात पडले. डॉ. मधुबाला या एका मुलीची आई आणि एका उच्चपदस्थ अधिका-याच्या पत्नी होत्या. त्यांचे सामाजिक स्थान दखल घेण्याजोगे उच्च प्रतीचे होते.

गेल्या वर्षी सन 2024 मधे डॉ. मधुबाला या जळगाव येथे बदलून आल्या होत्या. जळगाव शहर महानगरपालिका संचलित रुग्णालयात त्यांची नियुक्ती झाली. त्यावेळी असलेले त्यांचे प्रमुख एक चांगले अधिकारी होते. मात्र सहा ते सात महिन्यातच त्यांचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी बदलले. त्यांच्या जागी डॉ. विजय पंडित घोलप यांची नियुक्ती झाली. डॉ. विजय घोलप हे एक “रंगिला रतन” प्रकारातील अधिकारी होते. सहकारी महिला डॉक्टर असलेल्या मधुबाला यांचे रुप बघून डॉ. विजय घोलप यांची नजर बिथरली. बिथरलेली त्यांची नजर लवकरच डॉ. मधुबाला यांच्या रुपावर खिळली. “राजेश खन्ना” अभिनीत “रेड रोज” चित्रपटातील नायकाप्रमाणे त्यांचे ओठ डॉ. मधुबालाचे सौंदर्य बघून थरथरु लागले.
एके दिवशी डॉ. मधुबाला व त्यांच्या महिला सहकारी नेहमीप्रमाणे दैनंदीन कामकाजात व्यस्त होत्या. त्यावेळी डॉ. विजय घोलप हे डॉ. मधुबाला यांच्या कॅबीनमधे आले. मी तुमच्या बाबतीत खुपच पझेसिव्ह आहे, दवाखान्यात येणारे जाणारे लोक तुमच्या रुपाकडे वाईट नजरेने बघतात. त्यामुळे तुम्ही माझ्या कॅबीनमधे शिफ्ट व्हा असा सल्ला डॉ. विजय घोलप यांनी डॉ. मधुबाला यांना दिला. परंतु आपल्याला कुणाचाही कधी त्रास झाला नसल्याचे डॉ. मधुबाला यांनी डॉ. विजय घोलप यांना सांगितले. त्यामुळे आपल्याला तुमच्या कॅबीनमधे शिफ्ट होण्याचा प्रश्नच येत नाही असे त्यांनी डॉ. घोलप यांना स्पष्ट केले.
आपण डॉ. मधुबाला यांच्यावर फेकलेले प्रेमाचे जाळे निष्प्रभ झाल्याचे डॉ. घोलप यांच्या लक्षात आले. त्यामुळे काही दिवस त्यांनी शांत राहण्याचे ठरवले. मात्र त्यांचे मन त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. एके दिवशी ते वारंवार काही ना काही कारण पुढे करत स्वत:च डॉ. मधुबाला यांच्या कॅबीनमधे आले. डॉ. मधुबाला यांच्या खुर्चीवर सतत विराजमान होत त्यांनी त्यांच्याशी एकेरी शब्दात जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
“मधु तु तुझे शुज काढ, मला तुझे पाय बघायचे आहे, तुझ्या अंगावरील तिळ मला खुप घायाळ करतोय” असे अश्लिल बोलून त्यांनी तिच्या स्त्री मनाचा विचार न करता लज्जास्पद बोलण्यास सुरुवात केली. आता पुलाखालचे पाणी पुलावरुन वाहण्यास सुरुवात झाल्याचे डॉ. मधुबाला यांच्या लक्षात आले होते. “सर तुम्ही हे सर्व प्रकार बंद करा, तुम्हाला हे शोभत नाही, तुम्ही माझे सिनीयर असल्यामुळे मी तुमच्या पदाचा मान ठेवते. तुम्ही समजता मी तशी बाई नाही” अशा स्पष्ट आणि समजण्याजोग्या शब्दात डॉ. मधुबाला यांनी डॉ. विजय घोलप यांना सांगितले. आपण फेकलेले जाळे पुन्हा निष्प्रभ झाल्याचे डॉ. घोलप यांच्या लक्षात आले. त्यामुळे ते कॅबीनमधून निघून गेले.
डॉ. घोलप निघून गेल्यानंतर डॉ. मधुबाला यांनी हा प्रसंग कार्यालयातील इतर महिला सहका-यांना कथन केला. डॉ. विजय घोलप यांच्याशी पुन्हा एकवेळा स्पष्टपणे बोलून हा विषय कायमचा मिटवून टाकावा असे सर्वांचे मत पडले. त्यामुळे त्याच दिवशी डॉ. मधुबाला यांनी डॉ. घोलप यांच्या कॅबीनमधे जावून त्यांना सांगितले की ” तुमच्या मनात काय आहे, हे मला चांगल्या प्रकारे दिसत आहे”. त्यावर लागलीच डॉ. घोलप यांनी त्यांना उत्तर दिले की माझ्य मनात तुझ्याविषयी फिलींग्ज आहेत. त्यावर डॉ. मधुबाला यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही जे काही करत आहात ते चुकीचे असून ते मला आवडत नाही. तुम्ही कृपा करुन हा प्रकार थांबवा, मला हा प्रकार आवडत नाही. तुम्ही माझे सिनीअर आहात. मी तुम्हाला नाही म्हटले तर तुम्ही अन्य मार्गाने मला त्रास द्याल. मी तुम्हाला विनंती करते की मला भविष्यात कुठलाही त्रास देऊ नका. एवढे बोलून डॉ. मधुबाला बाहेर निघून आल्या.

आपण फेकलेले प्रेमाचे जाळे पुन्हा निष्प्रभ झाल्याचे लक्षात आल्यानंतर डॉ. घोलप पुन्हा काही दिवस शांत बसले. त्यांनी डॉ. मधुबाला यांच्या कॅबीनमधे येण्याचा प्रकार बंद केला. काही दिवस असेच निघून गेले. मात्र पुन्हा त्यांची फाजील चळवळ सुरु झाली. आता त्यांचा आवेश आवाक्याबाहेर गेला. त्यांनी आवेशातच डॉ. मधुबाला यांना त्यांच्या कॅबीनमधे बोलावले. आजही माझ्यासोबत कार्यालयातील काही महिला ए टू झेड पर्यंत सर्व गोष्टी करु देण्यास तयार असतात. तु किती दिवस मला नकार देणार आहे? एके दिवशी तु राजी होशीलच. मी तुला तसे करायला भाग पाडेल अशा गलिच्छ शब्दात डॉ. घोलप यांनी डॉ. मधुबाला यांना सुनावले.
एवढ्या गलिच्छ शब्दात आपल्याला डॉ. घोलप यांचे बोलणे ऐकावे लागेल याची कल्पना देखील डॉ. मधुबाला यांनी केली नव्हती. त्यांच्या नयनातून अश्रुंची गंगा वाहू लागली. त्या लागलीच डॉ. घोलप यांच्या कॅबीनमधून बाहेर आल्या. त्यांनी हा प्रकार आपल्या महिला सहका-यांसमवेत शेअर करुन आपले दुख: हलके करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पुन्हा काही दिवस असेच निघून गेले.
या घटनेनंतर काही दिवसांनी पुन्हा डॉ. घोलप यांच्या फाजील चळवळीने उभारी घेतली. त्यांनी फर्मान सोडून डॉ. मधुबाला यांना आपल्या कॅबीनमधे बोलावले. यावेळी त्यांनी डॉ. मधुबाला यांच्याकडे बघून घाणेरडे इशारे, फ्लाईंग किस वगैरे प्रकार केले. डॉ. मधुबाला यांच्या स्त्री मनात त्यांच्या या प्रकारामुळे त्यांच्याविषयी घृणा निर्माण झाली. एवढेच नव्हे तर डॉ. घोलप यांनी डॉ. मधुबाला यांना स्पर्श करुन शरीर सुखाची मागणी देखील केली. आता मात्र अती छेडखानी होत असल्याचे बघून डॉ. मधुबाला यांनी तातडीने कॅबीनमधून बाहेर पडणे योग्य समजले.
दिवसागणिक डॉ. घोलप यांचे चुकीचे प्रकार वाढतच होते. त्यांची भिड जणू काही चेपली होती. ते डॉ. मधुबाला यांना कार्यालयीन वेळ संपल्यानंतर देखील काही ना काही कारणास्तव थांबवू लागले. अतिशय घाणेरड्या व द्विअर्थी भाषेत ते तिच्याशी संभाषण करु लागले. ते आता समजण्यापलीकडे गेले होते. त्यांच्यात काहीही सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नव्हती. डॉ. मधुबाला यांचा विरोध त्यांना सहन होत नव्हता. मी कार्यालयाचा बॉस आहे, माझे कुणी काहीच करु शकत नाही अशा अविर्भावात त्यांचे उद्दाम वागणे सुरुच होते. सर्व जण मला घाबरतात. त्यामुळे मला कोण काय समजावणार आहे आणि काय विरोध करणार आहे, एके दिवशी तुलाच माझ्याकडे यावे लागेल अशा शब्दात बोलून डॉ. घोलप यांचा डॉ. मधुबालावर छळ सुरु होता. एकीकडे नोकरी तर दुसरीकडे समाजातील बदनामी अशा दुहेरी कचाट्यात महिला डॉ. मधुबाला सापडल्या होत्या. त्यांची सहनशक्ती कधी कधी मर्यादाबाहेर जात होती.
एके दिवशी डॉ. घोलप यांच्याकडून होणारा त्रास डॉ. मधुबाला यांनी आपल्या पतीजवळ कथन केला. त्यामुळे डॉ. मधुबाला यांच्या अधिकारी पतीने थेट डॉ. घोलप यांना फोन लावून समजावून सांगत हा प्रकार बंद करण्यास सांगितले. याशिवाय डॉ. घोलप यांच्या पत्नीसोबत देखील त्यांनी बोलणे केले. डॉ. घोलप हे कशा प्रकारे घाणेरडे शब्द वापरुन डॉ. मधुबाला यांच्याशी संवाद साधतात, त्यांचा कसा छळ करतात हे सौ. घोलप यांच्या कानावर टाकण्यात आले. आपल्या पती महोदयांना समजावून सांगा अशी विनंती डॉ. मधुबाला यांच्या पतीने सौ. घोलप यांना केली.
कितीही समजावून सांगितले तरी डॉ. घोलप यांच्या वागणूकीत सुधारणा होत नव्हती. त्यामुळे जून 2025 मधे डॉ. मधुबाला यांनी थेट जळगाव शहर महानगरपालिकेत पॉश कायदा 2013 नुसार डॉ. घोलप यांच्याविरुद्ध तक्रार दिली. ही तक्रार डॉ. मधुबाला यांनी मागे घ्यावी यासाठी डॉ. विजय घोलप यांनी कार्यालयातील काही पुरुष व काही महिला कर्मचा-यांना डॉ. मधुबाला यांच्या घरी पाठवले. डॉ. मधुबाला यांच्यासह त्यांच्या पतीवर दबाव टाकून धमकी देण्याचा प्रकार आता नव्याने सुरु झाला. डॉ. घोलप हे काहीही करु शकतात. दिलेली तक्रार मागे घेतली नाही तर डॉ. घोलप तुम्हाला आणि तुमच्या पतीला मारुन टाकू शकतात अशी तंबी स्टाफकडून देऊन दोघा पती पत्नीच्या मनात भिती घालण्यात आली.
काही दिवसांनी डॉ. घोलप यांनी डॉ. मधुबाला यांना कॅबीनमधे बोलावून घेतले. त्याठिकाणी अगोदरच दोन अनोळखी लोक उपस्थित होते. दोघांपैकी एका जणाकडे बंदूक असल्याची डॉ. मधुबाला यांना जाणीव करुन देण्यात आली. तक्रार मागे घेण्याच्या प्रिंटेड अर्जावर निमूटपणे सही करण्यासाठी यावेळी दबाव टाकण्यात आला. मात्र सही करणार नसल्याच्या मतावर ठाम रहात डॉ. मधुबाला यांनी तेथुन प्रस्थान केले. त्यानंतर एका महिलेला घरी पाठवून तक्रार अर्ज मागे घेण्याच्या अर्जावर सही करण्यास दबाव टाकण्यात आला. डॉ. विजय घोलप यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे नाईलाजाने डॉ. मधुबाला यांनी जळगाव शहर पोलिस स्टेशन गाठत पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्याकडे आपली कैफीयत मांडली. पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांनी डॉ. मधुबाला यांची व्यथा शांतपणे ऐकून घेतली. संबंधीत ठाणे अंमलदारास आदेशित करुन शनीपेठ पोलिस स्टेशनच्या महिला पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या समक्ष ही फिर्याद दाखल करण्यात आली. गु.र.नं. 350/25 कलम 74, 75 (2), 75 (3), 78, 79, 351 (3) नुसार या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अशोक खेडकर करत आहेत.








