दोन किलो चरस मुंबई पोलिसांनी केला जप्त

On: September 16, 2020 9:42 PM

मीरारोड : मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने भाईंदर पूर्वेच्या पालिका क्रीडा संकुल परिसरात टाकलेल्या छाप्यात दोन किलो चरस व दोघांना अटक केली. ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत अमली पदार्थ विरोधी पथकाने घातलेल्या या छाप्याने खळबळ उडाली आहे.

अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सध्या अमली पदार्थ तस्करीचा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. त्यातून अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाया देखील सुरु आहेत.

अविनाश सिंह (२४) रा. जगदीप अपार्टमेंट, नालासोपारा तसेच श्रवण गुप्ता (३८) रा. गुरुनानक चाळ, कैलाश दर्शन जवळ, नालासोपारा अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. त्यांच्या कब्जातून २ किलो ४० ग्राम चरस जप्त करण्यात आला. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार व पुरवठादार भाईंदर पूर्वेचा रहिवासी बळीराम उर्फ बल्ली असल्याची माहिती चौकशीतून पुढे आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment