आजचे राशी भविष्य (17/09/2020)

On: September 17, 2020 7:32 AM

आजचे राशी भविष्य

मेष
प्रत्येकाच्याच गरजा पुर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. मेहनत व सहनशीलतेच्या बळावर तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल.

वृषभ
अचूक संवाद हाच तुमचा महत्त्वपूर्ण गुण असेल. परिवारासोबत वेळ घालवणे आनंदाचे निदान ठरेल.

मिथुन
आज तुम्ही शांततेत रहाल तसेच मौजमजा करण्याचा मुड होईल. धनलाभ देखील होवू शकतो. फावल्या वेळेचा सदुपयोग करा.

कर्क
आज तुमची दिनचर्या व्यस्त राहून देखील तुम्ही स्वतःसाठी वेळ काढणार आहात. या वेळेत तुम्ही कुटूंबासमवेत चर्चा व गप्पा करा.

सिंह
पूर्वी केलेल्या कामातून मिळालेले यश तुमचा आत्मविश्वास वाढवेल. धन लाभ होण्याची शक्यता आहे.

कन्या
या राशीतील लोकांना आज स्वत:साठी वेळ काढण्याची आवश्यकता आहे. दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम, विश्रांती मिळेल.

तुळ
अनेक लोक तुम्हाला नवी स्वप्ने आणि आशा दाखवतील मात्र आपल्या प्रयत्नांवर खुप काही अवलंबून असेल.

वृश्चिक
ब-याच काळापासून वाट पहात असलेली कीर्ती आणि मान्यता मिळेल. घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका.

धनु
कामाचा व्याप वाढेल. त्यातून कमी अधिक प्रमाणात चुका होण्याची शक्यता असली तरी मन स्थिर ठेवा. उत्कृष्ठ वागणूक महत्वाची ठरेल.

मकर
तुम्ही तुमच्या खास पद्धतीने अनेकांना हाताळले आहे. आज तुम्ही तुमच्या बुद्धीच्या बळावर लोकांना पटवण्यात यशस्वी व्हाल.

कुंभ
आज धन संचय करण्याचा विचार बनवा. प्रलंबीत कामे पुर्ण करण्यासाठी चांगला दिवस. विचारपुर्वक निर्णय घेवून समस्या संपवण्याचा प्रयत्न करा.

मीन
प्रपंचात उत्साह राहील . आकर्षक खरेदीचा योग आहे. परिचय वाढल्याने प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment