जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे माजी व्यवस्थापकीय संचालक सुनील देशपांडे यांचे देहावसान

On: October 6, 2025 9:44 PM

जळगाव दि. ६ प्रतिनिधी – जैन इरिगेशनच्या जैन फार्म फ्रेश फुडस् लि.चे माजी व्यवस्थापकीय संचालक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावलेले सुनील शंकरराव देशपांडे यांचे ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले.  त्यांचे वय ६५ वर्षे होते. ते अनुभूती निवासी स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून काम केलेल्या श्रीमती पूजा देशपांडे यांचे पती होते. ५ ऑक्टोबर रोजी अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान त्यांची प्रकृती अधिकच खालावली व त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व कन्या डॉ. सृष्टी, जावई असा परिवार आहे. ‘जैन फार्म फ्रेश फूड्स लिमिटेड जैन फूड पार्क येथे मार्च २००४ ला ते सिनियर व्हाईस प्रेसिडेंट या पदावर रुजू झाले होते. ३० मे २०१६ मध्ये त्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती झाली होती. ते २०२१ पर्यंत कंपनीत कार्यरत होते.

देशपांडे यांनी अनेक नवकल्पना राबवून फळ व भाजीपाला प्रक्रिया क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले होते. सहकाऱ्यांमध्ये ते शांत, संयमी आणि मदतीस तत्पर असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या जाण्याने देशपांडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, जैन इरिगेशनच्या विस्तारीत परिवारातर्फे त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment