171 किलो गांजाची शेती उध्दवस्त

On: October 9, 2025 9:58 PM

जळगाव : अती दुर्गम भागात रावेर तालुक्यातील मोरव्हाल या गावी गांजाची 171 किलो वजनाची शेती रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने उध्वस्त केली आहे. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई यशस्वी करण्यात आली. युसुफ अकबर तडवी यास या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

युसुफ अकबर तडवी याने मानवी मेंदूवर परिणाम करणा-या गांजाची शेती दोन एकर शेतात तुर या पिकाच्या मधोमध लावली होती. या पिकाचे अंदाजीत बाजारमुल्य सतरा लाख एवढे आहे. घटनास्थळ असलेले गांजाचे शेत अती दुर्गम भागात असल्यामुळे पोलिस पथकाला तिन किलोमीटर पायपीट करावी लागली. पोलिस उप अधिक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि डाँ विशाल जयस्वाल व त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक तुषार पाटील, मनोज महाजन, गुन्हे शोध पथकातील पोना कल्पेश आमोदकर, पोकाँ प्रमोद पाटील, विशाल पाटील, श्रीकांत चव्हाण, भुषण सपकाळे, राहुल परदेशी, योगेश पाटील पाल दुरक्षेत्रचे पोहेकाँ ईश्वर चव्हाण, पोहेकाँ जगदीश पाटील, पोकाँ ईस्माईल तडवी, पोकाँ गजाजन बोणे, कुंदन नागमल चालक पोहेकाँ गोपाळ पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment