तलाठी, कोतवालचा पंटर एसीबीच्या सापळ्यात

On: October 13, 2025 10:08 PM

जळगाव : तलाठी आणि कोतवालाच्या आशिर्वादाने वाळू वाहतुकीचा डंपर सुरु ठेवण्यासाठी दरमहा 73 हजाराची लाच मागणारा खासगी पंटर जळगाव एसीबीच्या सापळ्यात रंगेहाथ सापडला. भुसावळ तालुक्यातील वराडसीम येथील तलाठी नितीन पंडीतराव केले, कोतवाल जयराज रघुनाथ भालेराव आणि खासगी पंटर शिवदास लटकन कोळी अशा तिघांविरुद्ध भुसावळ शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्यातील तक्रारदाराचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून त्यांच्याकडे वाळू वाहतुकीचे डंपर आहे. तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासाठी दरमहा 73 हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागेल असे पंटर शिवदास कोळी याच्यामार्फत तक्रारदारास सांगण्यात आले होते. या लाचेच्या हप्त्याच्या देवाणघेवाणीसाठी तलाठी व कोतवाल या दोघांनी प्रोत्साहन दिल्याचे एसीबीच्या पडताळणीत उघड झाले. लाच घेतांना खासगी पंटर शिवदास कोळी यास रंगेहाथ पकडण्यात आले.

तलाठी नितीन केले याच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात 1 लाख 65 रुपये रोख व दोन मोबाईल असा ऐवज आढळून आला. कोतवाल जयराज भालेराव याच्या अंगझडतीत एक मोबाईल आढळून आला. तसेच खासगी पंटर शिवदास कोळी याच्या अंगझडतीत लाचेची रक्कम 73 हजार तसेच अतिरिक्त 86 हजार रुपये आढळून आले.

पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी स्मिता नवघरे, सापळा पथकातील पोलिस निरीक्षक हेमंत नवघरे, पोलिस उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, पोलिस नाईक बाळू मराठे, पो.कॉ. राकेश दुसाने, प्रणेश ठाकुर, भुषण पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment