सुमित पाटील यांचा सन्मान

On: September 17, 2020 6:19 PM

जळगाव : जळगाव तालुक्यातील वावडदा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा गौरी गृपचे चेअरमन सुमित जानकीराम पाटील यांचा जळगाव येथील केसीई सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी कोरोना महामारीच्या काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. त्यांना “कोरोना वॉरीयर्स” सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. कोरोना व लॉकडाऊन संकट काळात अनेक गोरगरीब, हातमजुरी करणाऱ्या नागरिकांना त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले.

खान्देश कुणबी मराठा वधुवर परिचय गृपच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना कमीत कमी उपस्थितीत व खर्चात शासनाचे नियम पाळून विवाह पार पाडण्याचे त्यांनी वेळोवेळी आवाहन केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment