“वाक फॉर युनिटी”च्या माध्यमातून राष्ट्रीय अखंडता आणि बंधुतेचा संदेश

On: October 25, 2025 9:22 PM

जळगाव : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमीत्त जळगाव पोलिस दलातर्फे “वॉक फॉर युनिटी” या रॅलीचे आयोजन करण्यात आले. पाच कि.मी. वॉकींग रॅलीची सुरुवात सकाळी सात वाजता जळगाव शहर वाहतुक शाखेच्या प्रांगणातून करण्यात आली. जिल्हाधिकारी रोहन घुगे व पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवी झेंडी दाखवून या रॅलीची सुरुवात केली. राष्ट्राचे ऐक्य, अखंडता आणि बंधुतेचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.

जळगाव पोलिस दलातील अधिकारी, अमंलदार, शहरातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, समाजसेवक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर याप्रसंगी सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधीकारी नितीन गणापुरे यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती होती.

जळगाव शहर वाहतुक शाखेच्या प्रांगणातून सुरुवात झालेली ही रॅली स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, डी मार्ट पर्यंत व तेथुन परत पोलीस कवायत मैदानात आल्यानंतर या रॅलीचा समारोप झाला. याप्रसंगी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी आपल्या भाषणात राष्ट्रपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकात्मतेच्या कार्याचा उल्लेख करुन सर्वांना एकतेचा संदेश दिला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मानव संसाधन विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, राखीव पोलीस निरीक्षक प्रशांत सुगरवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती योगीता नारखेडे, राखीव पोलीस उपनिरीक्षक चिवंडे, सर्व कवायत निर्देशक व वेल्फेअर अंमलदार यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment