कोरोना झाल्याचा केला बनाव ; थाटला दुसरीसोबत संसार

मुंबई : पत्नीपासून आपले प्रेमप्रकरण लपवण्यासाठी पतीने आपल्याला कोरोनाची बाधा झाल्याची बतावणी केली. आता आपण मरणार असल्याची बतावणी करत त्याने प्रेयसीसोबत दुस-या शहरात घरोबा केला. मात्र त्याचा हा बनाव पोलिस तपासात उघड झाला.

एका विवाहित तरुणाने आपल्याला कोरोनाची बाधा झाली असल्याची खोटी माहिती पत्नीला फोनवर दिली. ‘मला कोरोना झाला असून आता मी मरणार असे त्याने पत्नीला सांगत फोन कट केला. त्यानंतर त्याचा फोनच बंद झाला व तो लागतच नव्हता.

21 जुलैनंतर हा तरुण गायब झाला होता. त्याची तक्रार पत्नीच्या नातलगांनी पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी तपास केला असता, हा तरुण कुठल्याही कोविड केअर सेंटर मधे दाखल नव्हता. पोलिसांनी  शेवटची शक्यता पडताळून बघण्यासाठी त्याचा वाशीच्या खाडीत देखील तपास केला.

या गुन्ह्याचे तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी त्याच्या फोनचे लोकेशन घेण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. अखेर एके दिवशी त्याच्या फोनले लोकेशन मध्य प्रदेशात सापडले. त्यानंतर त्याचे प्रेम प्रकरण उघडकीस आले. आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी हा प्रियकर थेट मध्य प्रदेशात इंदोर येथे गेला होता. तिथे तो तिच्यासोबत नाव बदलून रहात होता. त्याने तिच्यासोबत संसार देखील थाटला होता.

आपल्याला ‘कोरोनाची लागण झाल्याचे फोनवर सांगत आपण लवकरच मरणार असल्याचं त्याने बायकोला सांगितलं होतं. त्यानंतर त्याचा मोबाईल बंद होता. दुसऱ्याच दिवशी त्याच्या मेहुण्याला वाशी परिसरातील एका गल्लीत त्याची दुचाकी आणि बॅग, पाकिट आढळून आलं. याप्रकरणी त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. त्यादृष्टीनेच तपास सुरू होता.’ याप्रकरणी पोलिसांनी सगळी कोरोना केंद्र, रुग्णालयं तपासली. वाशी खाडीतही त्या तरुणाचा शोध घेण्यात आला. मागच्या आठवड्यात पोलिसांना इंदोर इथे या मोबाइलचं लोकेशन सापडलं. नवी मुंबई पोलिसांनी इंदोर गाठलं असता त्या व्यक्तीचे विवाहबाह्य संबंध असल्याचं पितळ उधडं पडलं. तो तेथे स्वतःची ओळख लपवून घर भाड्याने घेऊन राहात होता, असं पोलिस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी सांगितलं. या तरुणाला पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतलं आणि मुंबईला आणून त्याच्या पत्नीच्या ताब्यात दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here