माजी मंत्री खडसेंच्या बंगल्यातील चोरीचा मुद्देमाल हस्तगत – तिघे अटक, तिघे फरार

On: November 3, 2025 4:04 PM

जळगाव : माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या जळगाव येथील “मुक्ताई” बंगल्यात चोरी करणारे मुख्य तिघे चोरटे फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. मात्र असे असले तरी इतर तिघांना ताब्यात घेण्यात आले असून सोन्या चांदीच्या दागिन्यांचा 6 लाख 21 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. रोख 35 हजार रुपयांसह एकुण 6 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल या घटनेत चोरी झाला होता.

या चोरी प्रकरणात एकुण सहा जणांचा सहभाग निष्पन्न झाला आहे. या सहापैकी मुख्य तिन चोरटे फरार असून त्यांना आश्रय देणारा यापुर्वीच अटकेत आहे. दागिने विक्री करणारा आणि विकत घेणारा अशा दोघांना पोलिसांनी अधिक तपासात अटक केली आहे.

या घटनेत उल्हासनगर येथील रहिवासी असलेले मोहम्मद बिलाल उर्फ बिल्ला अब्दुल करीम चौधरी, एजाज अहमद उर्फ सलीम अब्दुल चौधरी आणि बाबा (पुर्ण नाव माहीत नाही) अशा तिघांनी खडसे यांच्या बंगल्यात चौर्यकर्म केले आहे. जळगाव शहरातील मास्टर कॉलनीत राहणा-या जियाउददीन हुस्नोददीन शेख याने तिघा चोरट्यांना आश्रय आणी त्याची दुचाकी वापरण्यास दिली होती. हे चौघे एकमेकांचे नातेवाईक आहेत.

या चौर्यकर्मानंतर तिघा चोरट्यांनी त्यांच्या कब्जातील मुद्देमाल उल्हासनगर येथील चिराग इकबाल सैय्यद याच्या हवाली केला होता. चिराग सैय्यद याने तो मुद्देमाल कल्याण येथील कैलास हिराचंद खंडेलवार या सराफाला विक्री केला. पोलिसांनी मुद्देमाल घेणारा चिराग इकबाल सैय्यद आणि कैलास हिराचंद खंडेलवार या दोघांना अटक केली आहे. अशा प्रकारे आतापावेतो तिघे जण पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. तिघे मुळ चोरटे फरार असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्यासह फौजदार सचिन रणेशवरे, हे कॉ सुशिल चौधरी, सुधाकर अंभोरे, जितेंद्र राजपुत, विनोद सुर्यवंशी, पोना हेमंत कळसकर, रेवानंद साळुंखे, योगेश बारी, मनोज सुरवाडे, अतुल चौधरी, पोकॉ गोविंदा पाटील, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार शरद बागल, शेखर डोमाळे, हे कॉ अक्रम शेख, विजय पाटील, प्रविण भालेराव, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, किशोर पाटील, मुरलीधर धनगर, पोकॉ रविंद्र कापडणे, राहुल रगडे, दिपक चौधरी, बबन पाटील, प्रदीप चौरे, महेश सोमवंशी, कुंदनसिंग बयास आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. पुढील तपास रामानंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक सचिन रणेशवरे करत आहेत. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment