जळगावच्या रथोत्सवातून मंगळसुत्र चोरट्या महिला ताब्यात 

On: November 3, 2025 9:10 PM

जळगाव – जळगाव येथील रथोत्सवात गर्दीचा गैरफायदा घेत महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र गायब करणा-या चोरट्या महिलांच्या  त्रिकुटाला जेरबंद करण्यात जळगाव शहर पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. 2 ऑक्टोबर रोजी जळगाव शहरातील दाणा बाजार परिसरात रथ उत्सवाच्या गर्दीत काही महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरीच्या घटना घडल्या. ज्या महिलांचे मंगळसूत्र चोरीला गेले त्यांनी जळगाव शहर पोलीस स्टेशनला याबाबत तक्रारी केल्या होत्या.

सुमारे 77500 रुपयांच्या सोन्याच्या मंगळसुत्रातील वाट्या व मणी चोरट्या महिलांनी तोडून नेल्याबाबत फिर्याद दाखल करण्यात आली. पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली असलेल्या पथकाने काही संशयित महिलांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून चाळीस हजार रुपये किंमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला. 

सहाय्यक फौजदार सुनिल पाटील, पोहेकॉ नंदलाल दशरथ पाटील, विरेंद्र भगवान शिंदे, भगवान तुकाराम पाटील, उमेश भांडारकर, सतिश पाटील, योगेश पाटोल, पोकॉ भगवान रामराव मोरे, अमोल अशोक ठाकुर, प्रणय सुरेश पवार, हर्षदा सोनवणे, जयश्री मराठे, मोनाली राजपुत आदींनी या कामागिरीत सहभाग घेतला. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment