धडक कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पंधरा जण ताब्यात 

On: November 9, 2025 4:02 AM

जळगाव – मुक्ताईनगर परिसरात मध्यरात्री धडक कोंबींग ऑपरेशन राबवण्यात आले. या धडक कारवाईत मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील दोन फरार आणि चोरी, दरोडा स्वरुपातील तेरा अशा एकुण पंधरा आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले. एलसीबी आणि मुक्ताईनगर पोलिस स्टेशनच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत एक पोलीस निरीक्षक, चार सहाय्यक पोलिस निरीक्षक, 130 पोलीस अंमलदार व चार आर.सी.पी. पथके सहभागी झाली होती.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने मालमत्तेविरुध्दच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी, लालगोटा व हलखेडा या गावात ही विशेष मोहीम राबवण्यात आली. मध्यरात्री ताब्यात घेण्यात आलेल्या पंधरा जणांची सखोल चौकशी करण्यात आली. कमलेश्वर ज्ञानेश्वर पाटील व दिपमाला कमलेश पाटील (दोघेही रा. मधापुरी) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघा फरार आरोपींची नावे आहेत.

यापुर्वी चोरी/दरोडा या सारख्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या तेरा इसमांविरुद्ध भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 128 व 129 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

रोहित ऊर्फ गुरुदास सुदेश पवार, क्रिश निशांत पवार, किसन दिनु पवार, नितेश रितेश पवार, आर्यमन जिन्नु पवार, गिता नागेश पवार, धरमसिंग लखनसिंग भोसले, लखनसिंग युवराज भोसले, बाबुसिंग लखनसिंग भोसले, टोनी दर्शनलाल पवार, लकी टोनी पवार, सदानंद टोनी पवार, नयन सटा भोसले अशी हलखेडा, लालगोटा आणि मधापुरी येथील कारवाई करण्यात आलेल्या तेरा जणांची नावे आहेत.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment