दगडफेकीच्या घटनेवर पोलिसांनी मिळवले नियंत्रण

On: November 9, 2025 11:42 PM

जळगाव : जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात उद्भवलेल्या दगडफेकीच्या घटनेवर पोलिसांनी वेळीच धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत एक तरुण जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती देखील नियंत्रणात आहे.

क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या शाब्दिक वादाचे पर्यावसन दगडफेकीच्या घटनेत झाले होते. दरम्यान या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या या परिसरात शांतता आहे. घटनेची माहिती मिळतात पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आदींनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली होती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment