जळगाव – मध्य प्रदेशातील बुरहानपुर येथे रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापून चोरी करणाऱ्या दोघांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. वसीम कय्युम खाटीक (मास्टर कॉलनी जळगाव) आणि तौसीफ सत्तार खान (रामनगर जळगाव) अशी या दोघांची नावे आहेत. त्यांना बुऱ्हानपूर कोतवाली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. बुरहानपूर कोतवाली पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध रिक्षातील प्रवाशांचे खिसे कापून चोरी करण्याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हा गुन्हा जळगाव पोलिस रेकॉर्ड वरील गुन्हेगार वसीम कय्युम खाटीक व तौसीफ सत्तार खान या दोघांनी साथीदारांच्या मदतीने केल्याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपल्या पथकाच्या मदतीने दोघांना जेरबंद केले.
पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हे कॉ अकरम शेख, विजय पाटील, नितीन बाविस्कर, प्रविण भालेराव, किशोर पाटील, रविंद्र कापडणे, राहुल रगडे, नाना तायडे, महेश सोमवंशी यांनी या कामागिरीत सहभाग घेतला.






