तरुणाला विवस्त्र करत मारहाणी नंतर केली हत्या

On: September 18, 2020 7:06 PM

औरंगाबाद : एका तरुणाला बेदम मारहाण करून धारदार शस्त्राने अनेक ठिकाणी भोसकून त्याची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याची घटना आज औरंगाबाद येथे घडली. या तरुणाचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह झाडा झुडुपात फेकून देत मारेकरी पसार होण्यात यशस्वी झाले. फरार झाले. आज सकाळी पडेगाव येथील पवार हाऊस समोर घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.

मोहम्मद अझहर मोहम्मद हनिफ (23) अन्सार कॉलनी असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. पडेगाव पावर हाऊस नजीक मैदानात आज सकाळी काही नागरिक प्रांतर्विधीसाठी गेले असता त्यांना हा हत्येचा प्रकार दिसून आला.नागरिकांनी या घटनेची माहिती तातडीने नियंत्रण कक्षाला कळवली. पोलीस उप आयुक्त निकेश खाटमोडे, सहायक आयुक्त डॉ.दिनेशकुमार कोल्हे, गुणाजी सावंत, गुन्हे शाखेचे निरक्षक अनिल गायकवाड, छावणी पोलीस निरीक्षक मनोज पगारे, फॉरेन्सिक लॅबचे पथक, डॉग स्कॉड पथक यांनी तातडीने घटनस्थळ गाठत पुढील कारवाईला सुरुवात केली. मृतदेहाची पाहणी केली असता मयत तरुणाच्या डोक्याच्या पाठीमागील भागात जबर दुखापत झाली होती. कंबरेत धारदार वस्तूने भोसकले होते. गुडघ्यासह हाता पायांना बेदम मारहाणीचे व्रण दिसून आले.

मृतदेह उत्तरीय तपासणीकामी घाटी रुग्णालयात रवाना करण्यात आला. या प्रकरणी एका संशयिताला चौकशीकामी ताब्यात घेतल्याचे समजते. मयत अझहर पहाटे तीन वाजता घरी आला होता. त्यावेळी रोहन नावाच्या मित्राकडे जाऊन येतो असे म्हणत पुन्हा घरातून बाहेर गेला होता. त्यानंतर तो घरी आलाच नाही. मयत अझहर हा गुन्हेगारी प्रार्श्वभूमीचा असल्याचे समजते. त्याची जुन्या वादातून हत्या झाल्याचा अंदाज आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment