जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस दलातील सुरेल आवाजाचे गायक संघपाल तायडे यांच्या “तुला कॉलेजमा भेटायला येसू” या पहिल्याच अहिराणी गाण्याचे चित्रीकरण जळगाव शहरातील विविध निसर्गरम्य वातावरणात पूर्ण झाले आहे . या गाण्यात साउथ इंडियन ट्रॅकवर खानदेशी नृत्य कलावंत आपली कला दाखवतांना दिसणार आहेत. संघपाल तायडे यांची वर्दीतील दर्दी माणूस अशी ओळख त्यांच्या कलेतून टिकून आहे. त्यांनी आपले अभिनय व गायन कौशल्य आपल्या गीतांच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. त्यामुळेच ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले आहे .
त्यांनी गायलेले अहिराणी गाणे गुलाब गायकवाड यांनी शब्दबद्ध केले असून संगीत दिग्दर्शक विशाल वानखेडे तर सह दिग्दर्शक सुरेश राजपूत आहेत. ‘तुला कॉलेजमा भेटायला येसू , या गाण्याची रचना विठ्ठल गायकवाड व सौ. वैशाली गायकवाड यांची असून त्याला हेमंत पाटील यांची साथ लाभली आहे. या गीताच्या चित्रीकरणात संघपाल तायडे यांनी गायनासोबत दिग्दर्शन व अभिनय केला आहे. त्यांच्यासोबत सहकलाकार म्हणून त्यांची पत्नी भाग्यश्री तायडे यांची साथ लाभली आहे.
कॅमेरामन चारुदत्त वाणी, बाळू वाघ, संतोष ढिवरे, नृत्य प्रशिक्षक सचिन भिरुड उर्फ रँचो, नृत्य कलाकार विष्णू माळी, लक्ष्मण गायकवाड, करण मोरे, सचिन चव्हाण, करण शिंपी , स्वप्नील इंगळे, समाधान सपकाळे, वरुणराज मैराळे, प्रभाकर बोदडे यांच्यासह अन्य कलाकारांनी परिश्रम घेतले आहे.
दरम्यान संघपाल तायडे यांनी कोरोना काळात जनजागृती केली आहे. शेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘दुष्काळ’ हा लघुपट प्रसिद्ध केला आहे.
संघपाल तायडे यांनी व्यक्त केलेले आपले मनोगत बघा व ऐका व्हिडीओच्या माध्यमातून