आता व्हाट्सअँप द्वारे करता येईल लाचेची तक्रार

On: November 21, 2025 4:38 PM

जळगाव – जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाचा नवीन मोबाईल क्रमांक कायमस्वरुपी सुरू करण्यात आला असून तो थेट पोलिस उप अधीक्षकांकडे राहणार आहे. त्यामुळे थेट लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस उप अधीक्षकांसोबत नागरिकांचा संपर्क येणार असून त्यावर व्हाट्स अँपच्या माध्यमातून अथवा कॉल करुन लाचेची तक्रार दाखल करता येणार आहे. 

7588661064 असा हा कायमस्वरुपी मोबाईल क्रमांक आहे. लाचे संदर्भात माहिती देण्यासाठी अथवा तक्रार दाखल करण्यासाठी नागरिकांनी या मोबाईल क्रमांकाचा वापर करण्याचे आवाहन या विभागाकडून करण्यात आले आहे. 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment