आठ लाखाच्या रकमेसह दोघे बॅग लिफ्टर गजाआड 

On: November 26, 2025 6:39 PM

जळगाव – बॅग लिफ्टिंग करणाऱ्या दोघा गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आठ लाखाच्या रकमेसह अटक केली आहे. या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता. विजय शांताराम पाटील आणि जितेंद्र छोटुलाल जाधव अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. गोपनीय माहितीसह तांत्रिक तपासाच्या आधारे दोघांना ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. सखोल चौकशीअंती दोघांनी आपला गुन्हा कबुल केला. फिर्यादीकडून हिसकावून नेलेले आठ लाख रुपये दोघांकडून हस्तगत करण्यात आले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पीएसआय शरद बागल, सोपान गोरे, हे कॉ प्रविण भालेराव, मुरलीधर धनगर, सलीम तडवी, पो कॉ सिध्देश्वर डापकर, रतनहरी गिते, मयुर निकम, सचिन घुगे, प्रदीप सपकाळे यांच्यासह नेत्रम विभागाचे पो कॉ पंकज खडसे, मुबारक देशमुख, पोकॉ कुंदनसिंग बयास व सायबर विभागाचे पो कॉ गौरव पाटील, मिलींद जाधव आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment