जळगाव – जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील चोरी गेलेल्या कारसह चोरट्यास एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गजाआड केले आहे. विनय मनोहर जाधव असे नवनाथ नगर भागात राहणाऱ्या चोरट्याचे नाव आहे. 19 नोव्हेंबर 2025 च्या रात्री आठ वाजेच्या सुमारास मारुती स्विफ्ट डिझायर ही कार रामेश्वर कॉलनी परिसरातून चोरीस गेली होती.
कारमालकाने याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल केला होता. गुप्त बातमीदारासह सीसीटीव्ही फुटेज च्या माध्यमातून ओळख पटवून चोरट्यास त्याचा मार्ग काढून अटक करण्यात आली.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, हेड कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी, रमेश चौधरी, प्रमोद लाडवंजारी, किरण चौधरी, गिरीश पाटील, पोकॉ विशाल कोळी, नितीन ठाकुर, किरण पाटील, शशिकांत मराठे, नरेंद्र मोरे आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.






