जळगाव : बेदम मारहाण झालेल्या तरुणाचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याची घटना दोन डिसेंबरच्या रात्री घडली. तुषार चंद्रकांत तायडे असे मरण पावलेल्या जळगावच्या समता नगर परिसरातील रहिवासी तरुणाचे नाव आहे. तो यावल तालुक्यात एका अंत्यविधीत सहभागी होण्यासाठी आला होता. परतीच्या प्रवासादरम्यान काही तरुणांनी त्याची वाट अडवून त्याला मारहाण केली.
यावल नजीक रात्री सात ते आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मारहाणीनंतर त्याला जखमी अवस्थेत सोडून हल्लेखोर निघून गेले. काही नागरिकांनी त्याला स्थानिक ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. या घटनेची माहिती त्याच्या परिजनांना समजल्यानंतर त्यांनी रुग्णालयात घाव घेत आक्रोश केला. या घटने प्रकरणी यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री सुरू होते.






