जळगाव : महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओरबाडून पलायक करणा-या दोघा चोरट्यांना रावेर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. अजय गजानन बेलदार व नरेंद्र उर्फ निलेश अशोक बेलदार अशी अटक करण्यात आलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील चोरट्यांची नावे आहेत. दोघांनी दिलेल्या कबुलीनुसार रावेर आणि मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला दाखल मंगळसुत्र चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
दि. 1 डिसेंबर रोजी दुपारी तिनच्या सुमारास रावेर तालुक्यातील वाघोड येथील महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र मोटार सायकलवरील दोघा चोरट्यांनी हिसकावुन पलायन केले होते. या घटने प्रकरणी रावेर पोलिस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासात चोरट्यांनी रावेर शहरात गुन्हा करण्यापुर्वी रेकी केल्याचे आढळून आले. अधिक तपासात अजय बेलदार आणी निलेश बेलदार या दोघांना ताब्यात घेत त्यांची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीअंती दोघांनी आपला गुन्हा कबुल करत मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला दाखल गुन्हा देखील कबुल केला. त्यांना अटक करण्यात आली.
अटकेतील दोघांकडून त्यांच्या कब्जातील गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल, 13.304 ग्रॅम वजनाचे 1 लाख 75 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकुण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. उप विभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जायस्वाल व त्यांचे सहकारी पोलिस उप निरीक्षक तुषार पाटील तसेच पो.ना. कल्पेश आमोदकर, पो.कॉ. विशाल पाटील, प्रमोद पाटील, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, विकार शेख, भुषण सपकाळे, अतुल गाडीलोहार, सायबर पोलिस स्टेशनवे मिलींद जाधव व गौरव पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. अधिक तपास पोलिस उप निरीक्षक तुषार पाटील करत आहेत.






