केळी व्यापा-याकडून लाचेची मागणी – पोलिस हवालदाराविरुद्ध गुन्हा

On: December 10, 2025 5:20 AM

जळगाव : तक्रार अर्जातील नमुद रकमेच्या दहा टक्के (विस हजार रुपये) रक्कम लाचेच्या स्वरूपात मागणी करणा-या पोलिस हवालदाराविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश पवार असे निंभोरा पोलिस स्टेशनला कार्यरत व लाचेची मागणी करणा-या हवालदाराचे नाव आहे.

या प्रकरणातील तक्रारदाराने शेतक-यांकडून केळीचा माल घेऊन तो दिल्ली येथील व्यापा-यास विक्री केला होता. मात्र या व्यवहारात पैसे न मिळाल्याने तक्रार अर्ज निंभोरा पोलिस स्टेशनला देण्यात आला होता. या तक्रार अर्जात नमुद रकमेच्या दहा टक्के रकमेची मागणी हवालदार सुरेश पवार यांनी तक्रारदाराकडे केली होती.

याप्रकरणी तक्रारदाराने जळगाव एसीबी कार्यालया तक्रार केली होती. पडताळणीअंती हवालदार सुरेश पवार यांच्याविरुद्ध एसीबीच्या पोलिस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप अधिक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिनेशसिंग पाटील, हे.कॉ. किशोर महाजन, महिला हे.कॉ. संगिता पवार, पो.कॉ. राकेश दुसाने, अमोल सुर्यवंशी, भुषण पाटील, आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment