जळगाव – एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या चार घरपोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. या चारही गुन्ह्यातील मुख्य गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या शोध पथकाने अटक केली आहे. रमेश भुरुसिंग अनारे असे अटक करण्यात आलेल्या मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या घरफोड्याचे नाव आहे.
तांत्रिक तपासातून अटक करण्यात आलेल्या रमेश अनारे याने चारही गुन्हे त्याच्या साथीदारांच्या मदतीने केले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हे कॉ विजय पाटील, अक्रम शेख, किशोर पाटील, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, पो कॉ महेश सोमवंशी, बाबासाहेब पाटील आदींनी या तपासकामी सहभाग घेतला. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करत आहेत.




