जळगाव – घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या अभिलेख्यावरील दोघा गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे. शकील शेख ताजुद्दीन शेख ऊर्फ बंदर (कासमवाडी जळगांव) आणि साहिल शहा सद्दाम शहा ऊर्फ काल्या (तांबापुरा जळगांव) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
13 डिसेंबर 2025 रोजी सुप्रीम कॉलनी परिसरात शरीफ मुराद खाटिक हे चाळीसगांव येथे लग्न समारंभानिमित्त गेले होते. त्या कालावधीत त्यांच्या बंद घराचा कडी कोंडा तोडून अज्ञात चोरटयाने घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकुण 49 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाला होता. या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक तपासाअंती हा गुन्हा शकील शेख ताजुद्दीन शेख ऊर्फ बंदर आणि साहिल शहा सद्दाम शहा ऊर्फ काल्या या दोघांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, हे कॉ अक्रम शेख, विजय पाटील, पोलिस नाईक किशोर पाटील, राहुल रगडे, रविंद्र कापडणे, गोपाल पाटील आदींनी या गुन्ह्याच्या तपास आम्ही सहभाग घेतला. पुढील तपास एमआयडीसी पो.स्टे. चे पोहेकॉ किरण चौधरी करत आहेत.






