पतीनेच केले पत्नीचे अश्लील फोटो व्हायरल

On: September 19, 2020 7:27 PM

अहमदनगर : “माझ पिल्लु माझ्यावर रुसल” या नावाच्या व्हाट्सअ‍ॅप गृपवर महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करत तिला दमदाटी व जिवे ठार करण्याची धमकी देणारा आरोपी हा दुसरा-तिसरा कुणी नसून फिर्यादी महिलेचा पतीच असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले.

अहमदनगर सायबर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. आरोपी पती अकोले तालुक्यातील निळवंडे येथील रहिवासी आहे. बावीस वर्षाच्या या आरोपीचे तीन वर्षांपूर्वी फिर्यादी महिलेसोबत लग्न झाले होते. गेल्या एक वर्षांपासून त्याची पत्नी त्याच्याजवळ रहात नव्हती. त्यामुळे तिच्या बद्दल त्याच्या मनात राग होता. त्या रागातून पत्नीचा सुड घेण्यासाठी आरोपीने 13 सप्टेंबर रोजी स्वतःच्या मोबाईलमध्ये दुसऱ्याच्या नावे घेतलेले सिमकार्ड टाकले. त्यानंतर व्हाट्सअ‍ॅप वर “माझं पिल्लू माझ्यावर रुसलं” या नावाने एक व्हाटस अ‍ॅप गृप तयार केला. त्या गृपमधे त्याने त्याच्या पत्नीला सामील केले.

त्या ग्रुपवर त्याच्या पत्नीच्या चेह-यात छेडछाड अर्थात एडीत करुन नको त्या अवस्थेत व्हायरल केला. तशाच स्वरुपाचा एक फोटो त्याने फिर्यादी महिला अर्थात त्याच्या पत्नीला देखील पाठवला.

हे फोटो फेसबुकवर व्हायरल करण्याची त्याने तिला धमकी दिली. या प्रकरणी महिलेने 17 सप्टेंबर रोजी अहमदनगर सायबर पोलीस स्टेशनला फिर्याद नोंदवली. सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अरुण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रतीक कोळी, हेड कॉन्स्टेबल योगेश गोसावी, पोलीस नाईक मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, विशाल अमृते, भगवान कोंडार, पूजा भांगरे, वासुदेव शेलार यांच्या पथकाने तांत्रिक तपास सुरु केला. तपासाअंती त्याला अटक केली असता तो चक्क फिर्यादी महिलेचा पतीच निघाला. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment