पत्रकारांची ‘वज्रमुठ’ – गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक

On: January 31, 2026 9:21 AM

जळगाव (प्रतिनिधी) : पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवणा-या गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या महत्वाच्या बैठकीचे आयोजन जळगाव येथे करण्यात आले आहे. आक्रमक संघटना म्हणून ओळख असलेल्या या संघटनेची बैठक उद्या 1 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी एक वाजता जळगाव येथील  पद्मालय शासकीय विश्रामगृहात आयोजीत करण्यात आली आहे. या बैठकीत संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र व जिल्हाध्यक्षांसह जिल्हास्तरीय नुतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येणार आहेत.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या संघटनेची महत्वाची बैठक होत आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांची ‘वज्रमुठ’ अधिक मजबूत करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी या बैठकीचे विशेष आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीस केंद्रीय संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम, केंद्रीय उपाध्यक्ष रविंद्र पवार, केंद्रीय सचिव भगवान सोनार, केंद्रीय खजिनदार ललित खरे, केंद्रीय सदस्य गणेश पाटील, सुनील चौधरी, जोशीला पगारिया आदी पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पत्रकारिता क्षेत्रातील वाढती आव्हाने आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी संघटना सदैव तत्पर आहे. या बैठकीत केवळ नूतन कार्यकारिणीची निवडच होणार नाही तर संघटनेच्या भविष्यातील कार्याची दिशा देखील निश्चित केली जाणार आहे. जळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामीण व शहरी पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकजूट दाखवण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment