जळगाव – रात्रीच्या वेळी बंद अवस्थेतील दोन वाईन शॉपचे शटर तोडून त्यातील रोख रक्कम लंपास करणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केला आहे. रामनिवस मंजू गुप्ता असे ठाणे जिल्ह्याच्या कल्याण येथील रहिवासी असलेल्या चोरट्याचे नाव आहे. जळगाव शहरातील जिल्हापेठ पोलिस स्टेशन हद्दीतील प्रिन्स वाईन शॉप आणि एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील राज वाईन्स या दोन वाईन शॉप फोडून रामनिवास गुप्ता याने रोकड चोरुन नेली होती. या चोरीचा घटने प्रकरणी अनुक्रमे दोन्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दोघा वाईन शॉप मधील चोरीच्या रकमेपैकी तीन लाख चार हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल तसेच सहायक फौजदार अतुल वंजारी, पो. हे. कॉ. विजय पाटील, नितीन बाविस्कर, अक्रम शेख, उमाकांत पाटील, पो.ना. किशोर पाटील, रवींद्र कापडणे, प्रशांत परदेशी, नेत्रम विभागातील मुबारक देशमुख आदींनी या गुन्ह्याच्या तपास कामी सहभाग घेतला.
अटकेतील रामनिवस मंजू गुप्ता याच्या विरुद्ध सानपाडा पो.स्टे. (ठाणे शहर), नेरुळ पो.स्टे. (नवी मुंबई), ठाणे शहर पो.स्टे., काशिमिरा पो.स्टे. (मिरा-भाईदर), नालासोपारा पो.स्टे. (मिरा-भाईंदर), कोरेगांव पार्क पो.स्टे. (पुणे शहर) या पोलीस स्टेशनला देखील गुन्हे दाखल आहेत. जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल गुन्हयाचा तपास पो.उप.निरी. गोपाल देशमुख व एमआयडीसी पो.स्टे. ला दाखल गुन्हयाचा तपास पोहेकॉ. भगवान चौधरी करत आहेत.








