पाठलाग करत रोखली अंमली पदार्थाची वाहतूक

On: March 4, 2026 10:26 AM

जळगाव – जळगाव स्थानिक गुन्हे शाखा आणि पहुर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने पाठलाग करत लाखो रुपयांच्या अमली पदार्थाची वाहतूक रोखण्यात यश मिळवले आहे. वाकोद या गावानजीक 2 मार्च रोजी 63 किलो 710 ग्रॅम वजनाच्या गांजासह सहा जणांना दोन कारसह अटक करण्यात आली आहे. सागर संजय इंगवले (नवी मुंबई), इरफान अकरम शेख, (गोरेगांव मुंबई), अमन ताज खान (मुंबई), नईम शेख याकुब (धुळे),आबीद खान मेहमुद खान (धुळे), तोहसिफ खान रसूल खान अशी अटक करण्यात आलेल्या सहा जणांची नावे आहेत. या सर्वांविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एम-एच 04-2042 या क्रमांकाची कार जळगाव येथून पहुरच्या दिशेने जात असून त्यात अंमली पदार्थाची वाहतुक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा आणि पहुर पोलिस स्टेशन या दोघांच्या संयुक्त पथकाने या इनोव्हा कारचा पाठलाग सुरु केला. वाकोद गावाच्या पुढे ही कार अडवण्यात आली. या कारमधे 63 किलो 710 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. कारमधील  सागर संजय इंगवले, इरफान अकरम शेख, अमन ताज खान या तिघांना ताब्यात घेत त्यांची चौकशी करण्यात आली.

चौकशीत तिघांनी कबुल केले की नईम शेख याकुब, आबीद खान मेहमुद खान आणि तोहसिफ खान रसूल खान या तिघांच्या सांगण्यावरुन त्यांनी हा गांजा खामगाव अकोला येथून खरेदी केला आहे. तसेच त्यांच्याच सांगण्यावरुन या गांजाची वाहतुक केली जात आहे. तिघे जण कारमाई पहुरच्या दिशेने येत असल्याची माहिती ताब्यातील तिघांनी पोलिस पथकाला दिली. त्या माहितीच्या आधारे उर्वरित तिघांना देखील ताब्यात घेण्यात आले. त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. अशा प्रकारे सहाही जणांविरुद्ध पहुर पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, पहुर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उप निरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.हे.कॉ. विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, पोलिस नाईक  किशोर पाटील, अंमलदार रवींद्र कापडणे, राहुल रगडे, अजय पाटील, चालक प्रविण हिवराळे, दर्शन ढाकणे तसेच पहूर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक ज्ञानेश्वर ढाकरे, दिपक पाटील, राहुल पाटील, संदिप धनगर, विनोद पाटील, राहुल जोहरे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सुस्ते करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment