तिच्यापुढे गौरवने सरसावला मैत्रीचा हात —- चाकू हल्ल्यात तिच्या भावाचा झाला घात

On: March 6, 2026 7:33 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क): विद्यालयातून कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेणारे विद्यार्थी हे कुमारवयीन विद्यार्थी असतात. अशा कुमारवयीन विद्यार्थ्यांना शालेय जीवनातून महाविद्यालयीन जीवनात आल्यावर ब-यापैकी मोकळीक अर्थात सुट मिळत असते. शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर बरीच बंधने असतात. ती बंधने महाविद्यालयात आल्यानंतर कमी होतात. त्यामुळे असे विद्यार्थी या मोकळीकीचा मनमुराद आनंद लुटतात. महाविद्यालयात आल्यानंतर अशा कुमारवयीन विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाजोगे कपडे परिधान करण्याची सुट मिळत असते. त्यामुळे बहुतेक विद्यार्थी  स्टाईलीश कपडे घालून भिन्नलिंगी विद्यार्थ्यांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. एखादी विद्यार्थीनी एखाद्या विद्यार्थ्याच्या मनात भरली म्हणजे तो हर प्रकारे तिला आपलेसे करण्याचा प्रयत्न करत असतो. कधी कधी असे प्रयत्न यशस्वी होतात तर कधी कधी त्यातून वादाचे प्रसंग देखील उद्भभवतात. जळगाव जिल्ह्याच्या यावल तालुक्यातील एका गावात असाच वादाचा प्रसंग घडला. त्यातून त्या विद्यार्थीनीच्या भावाचा चाकू हल्ल्यात जीव गेला.

यावल तालुक्यातील एका गावात गौरव नावाचा तरुण रहात होता. कनिष्ठ महाविद्यालयात शिकणारा गौरव हा तारुंण्याच्या सीमेवर उभा होता. तो अठरा वर्षाचा देखील नव्हता. तो ज्या गावात रहात होता त्याच गावातील एक तरुणी देखील तो शिकत असलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेत होती. दोघांचे गाव आणि महाविद्यालय एकच होते. ती अल्पवयीन तरुणी अल्पवयीन गौरवच्या मनात भरली. त्यामुळे हर प्रकारे तो तिला आपलेसे करण्याचा प्रयत्न करत होता. एके दिवशी त्याने तिच्याकडे मैत्रीचा प्रस्ताव ठेवला. तु माझ्यासोबत मैत्री कर असे तो तिला म्हणाला. मात्र तिने त्याच्या प्रस्तावाला नकार दिला. तिने हा प्रकार तिच्या घरी कथन केला. त्यामुळे तिच्या घरचे सदस्य गौरव याच्यावर चिडले. हा प्रकार प्राथमिक स्वरुपात असल्यामुळे सुरुवातीला मुलीच्या नातेवाईकांनी त्याला समज दिली. मात्र त्यामुळे त्याच्यावर फारसा फरक पडला नाही. गौरवचा तिच्यापुढे मैत्रीचा प्रस्ताव कायम होता. तो तिचा नाद सोडण्यास तयार नव्हता. त्यातून दोन परिवारात वादाची ठिणगी पडली. एकाच गावातील दोन परिवारात वादाची धुसफुस सुरु होती.

Anil Badgujar Dysp

दिनांक 28 फेब्रुवारी 2026 चा दिवस उजाडला. या दिवशी गौरवच्या आत्याने त्या मुलीच्या नातेवाईकाकडे बघून जोरजोरात शिवीगाळ सुरु केली. ‘यानेच माझा भाचा गौरवला गावातून पळवून लावले’ असे म्हणत तिने सुरु केलेली शिवीगाळ बघून इतर नातेवाईक जमा झाले.

Rameshwar Motale API

मुलीच्या नातेवाईकांनी गौरवच्या आत्याला समजावण्यास सुरुवात केली की मागचा विषय कशासाठी काढत आहात. बघता बघता दोन्ही परिवारातील नातेवाईक मोठ्या प्रमाणात जमा झाले. गौरवच्या परिवाराकडील काही नातेवाईक हातात काठ्या घेत रस्त्यावर आले. मुलीच्या नातेवाईकांना शिवीगाळ व काठीने मारहाण करु लागले. त्यात मुलीचा भाऊ त्याठिकाणी वाद सोडवण्यासाठी आला. त्यावेळी गौरव आणि त्याच्यासोबत असलेला मुंबई पोलिस दलातील कर्मचारी या दोघांच्या हातात चाकू होता असे काहींचे म्हणणे आहे. मात्र केवळ गौरवच्या हातात चाकू होता असे देखील काहींचे म्हणणे आहे.

‘मी पोलीस आहे, माझे कोणीच काही करु शकत नाही, यांना मारा’ असे तो म्हणाला. त्याचे ऐकून गौरवने मुलीच्या भावाच्या पोटावर तसेच अंगावर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. त्यात त्या मुलीचा भाऊ जखमी होत जमीनीवर कोसळला. जणू काही युद्धभुमीचे स्वरुप या घटनास्थळाला प्राप्त झाले होते. बराच वेळ हा प्रकार झाल्यानंतर सर्व हल्लेखोर कारने पळून गेले. मुलीचा भाऊ जबर जखमी तर इतर मोठ्या प्रमाणात जखमी झाले. मुलीच्या भावाच्या पोटात चाकूचे घाव बसल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी तातडीने सावदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिका-यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. या घटने प्रकरणी एका अल्पवयीनासह एकुण सात जणांविरुद्ध फैजपूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपासात या घटनेत केवळ एकच चाकू पोलिसांना मिळाला आहे.  या घटनेचा अधिक तपास डीवायएसपी अनिल बडगुजर, सहाय्यक पोलिस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मयोनोद्यीन सय्यद तपास करत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment