जळगाव : जळगाव पोलिस कर्मचा-याने चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून या घटनेमुळे जळगाव पोलिस दलात खळबळ माजली आहे. निलेश माधवराव पाटील असे आत्महत्या करणा-या एमआयडीसी पोलिस स्टेशनला कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
निलेश माधवराव पाटील हे चुलत आजोबाच्या तेराव्याच्या कार्यक्रमानिमीत्त कोदगाव येथे आले होते. रात्री ते आपल्या गावी कोदगाव येथे मुक्कामी होते. सोमवार 9 मार्चच्या सकाळी आठच्या सुमारास त्यांच्या आई व पत्नीने त्यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो झाला नाही. त्यांच्या चुलत भावाला त्यांची माहिती घेण्यासाठी पाठवले असता घटना उघडकीस आली.








