प्रियाची चुकली वाट, तिला भेटला प्रसाद —— अत्याचाराच्या घाटात तिची कायदेशीर साद

On: March 11, 2026 3:06 PM

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : मोहात पडलेल्या आणि रागात असलेल्या मनुष्याची मती मारली जाते. आपण काय करत आहोत, आपण करत असलेल्या कर्माचे काय परिणाम होणार आहेत याची त्याला जाणीव नसते. जो मनुष्य सद्सद् विवेक बुद्धीला स्मरण करत जागरुकपणे विचारपुर्वक निर्णय घेतो तो जीवनात यशस्वी होतो. रागाच्या भरात मनुष्याने कोणताही निर्णय घ्यायचा नसतो हा सुखी जीवनाचा एक साधा आणि सरळ मंत्र आहे. सुखी जीवनाच्या या मंत्राचे महत्व मनुष्याला साधारणपणे चाळीशी-पन्नाशी उलटल्यानंतर समजते. वयाच्या तिशीपर्यंत बहुतांश स्त्री पुरुष जोमात असतात. संतापाच्या भरात बघून घेऊ, करुन घेऊ असे मनाशी म्हणत ते बहुतेकदा चुकीचा निर्णय घेतात. या चुकीच्या निर्णयाचा त्यांना जीवनभर पश्चाताप करावा लागतो. कित्येकदा जेव्हा वेळ असते तेव्हा सुबुद्धी नसते आणि जेव्हा सुबुद्धी येते तेव्हा वेळ नसते. जळगाव शहरातील बड्या शासकीय कार्यालयात काम करणा-या एका कर्मचारी महिलेवर अशीच दुर्दैवी वेळ आली. अत्याचार, घटस्फोट, गर्भपात अशा विविध प्रसंगांना तोंड देण्याची तिच्यावर वेळ आली. अखेर तिने एमआयडीसी पोलिस स्टेशनला आपली कैफीयत मांडली. एका मुलीची आई असलेल्या या घटस्फोटीत तरुणीने दिलेल्या कैफियत नुसार संबंधीत इसमांविरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला.

प्रिया (काल्पनिक नाव) ही तिस वर्षाची तरुणी जळगाव येथील एका बड्या शासकीय कार्यालयात नोकरीला आहे. जळगावला येण्यापुर्वी ती अन्य जिल्ह्यात नोकरीला होती. सन 2019 मधे ती विवाहीत झाली. विवाहानंतर गुण्या गोविंदाने तिचा संसार सुरु होता. लग्नानंतर चार वर्ष दोघा पती पत्नीने जीवनाचा भरपूर आनंद लुटला. त्यानंतर प्रियाच्या संसार वेलीवर एका कन्या रत्नाचे आगमन झाले. कन्या रत्नाचे आगमन झाल्यानंतर प्रियाच्या नशिबी शासकीय नोकरीचा योग जुळून आला. कन्या रत्नाचा हा पायगुण म्हणावा लागेल.

मात्र शासकीय नोकरी मिळाल्यानंतर प्रिया आणि तिच्या पतीत बेबनाव सुरु झाला. दोघा पती – पत्नीत जमेनासे झाले. दोघांमधे काहीतरी  कारणावरुन तु तू मै मै सुरु झाले. अखेरीस दोघांनी विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. प्रियाच्या पाठीशी शासकीय नोकरी आणी दर महिन्याचा पगार होता. त्यामुळे विभक्त राहण्याचा तिच्यावर फारसा फरक पडला नाही. नोकरी आणि पगाराच्या बळावर ती जीवनाची वाटचाल करत होती. आपल्या मुलीचा सांभाळ करत होती.

Baban avhad Police Inspector

आपण अजून तरुण आहोत. आपल्यापुढे अजून बरेच आयुष्य पडले आहे. आपण नवीन जीवनसाथी शोधावा असा तिच्या मनात विचार येऊ लागला. नवीन जीवनसाथी मिळाला तर आपल्या मुलीला बापाचे छत्र मिळेल असा देखील तिने मनाशी विचार केला. प्रत्येक स्त्रीला जीवनात एका पुरुषाची साथ गरजेची आणि महत्वाची असते या विचारातून तिने ऑनलाईन मॅट्रीमोनीअल साईट्स बघण्याचा सपाटा लावला. त्यातून डिसेंबर 2024 या कालावधीत तिला कोणत्यातरी मॅट्रीमोनीअल साईट्स वर प्रसाद खंडेलवाल या तरुणाचे स्थळ आढळून आले. प्रसाद खंडेलवाल हा जळगावचा रहिवासी तरुण होता. किराणा दुकानदार असलेला प्रसाद खंडेलवाल हा घटस्फोटाच्या मार्गावर होता. त्याला देखील एका जीवनसाथीची गरज होती. प्रिया देखील आपल्या विद्यमान पतीपासून घटस्फोट घेण्याच्या मार्गावर होती. त्यामुळे ती विविध मॅट्रीमोनीअल साईट्सवर वर संशोधन करत होती. त्यातच तिची एका मॅट्रीमोनीअल साईट्स वर प्रसाद खंडेलवाल या तरुणासोबत ओळख झाली. दोघांचे फोनवर बोलणे झाले. दोघांनी एकमेकांना आपल्या मोबाईल क्रमांकाची आदान प्रदान केली. प्रसाद खंडेलवाल या तरुणाचे स्थळ प्रियाला योग्य वाटले. त्यातून दोघांचे संभाषण होत गेले. संभाषणातून दोघातील संपर्क आणि संपर्कातून सहवास वाढत गेला.

Rahul Tayade PSI

डिसेंबर 2024 चा तो काळ होता. या महिन्यात दोघांनी संत नगरी शेगाव येथील मंदीरात एकमेकांची प्रत्यक्ष भेट घेतली. दोघांनी आपापल्या विचारांची एकमेकांना आदानप्रदान केली. दोघांनी एकमेकांच्या आवडी निवडी, छंद यांची माहिती करुन घेतली. वेळोवेळी दोघात फोनवर बोलणे सुरु झाले. त्यानंतर दोघांनी नाशिकच्या त्रंबकेश्वर मंदीरात एकमेकांची भेट घेतली. यावेळी देव दर्शनानंतर दोघांनी नाशिकच्या एका हॉटेलमधे मुक्काम केला. या मुक्कामात दोघांमधे शरीर संबंध प्रस्थापीत झाले. लग्नाचे आमिष दाखवत प्रसादने आपल्या मर्जीविना शरीरसंबंध केले असे प्रियाचे म्हणणे आहे.

काही दिवसांनी प्रसादचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर काही दिवसांनी प्रसादचा वाढदिवस आला. या दिवशी त्याने प्रियाला आपल्या घरी जळगावला बोलावले. त्यामुळे अन्य जिल्ह्यात नोकरी करणा-या प्रियाने खान्देशातील जळगाव गाठले. तो तिला घेण्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेला. ठरल्याप्रमाणे त्याने तिला आपल्या घरी नेणे अपेक्षीत होते. मात्र तो तिला एका मंगल कार्यालयातील खोलीत घेऊन गेला. या ठिकाणी त्याने तिच्यासोबत शरीर संबंध प्रस्थापित केले. हे संबंध देखील  आपल्या मर्जीशिवाय झाले असे प्रियाचे म्हणणे आहे. आपले विवस्त्र अवस्थेतील फोटो प्रसादने त्याच्या मोबाईलमधे काढले असल्याचे देखील प्रियाचे म्हणणे आहे. घरी वाढदिवस साजरा झाल्यानंतर प्रसादने प्रियासोबत पुन्हा शरीर संबंध प्रस्थापित केले. वेळोवेळी प्रसादने आपल्या मर्जीशिवाय आपल्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले असे प्रियाचे म्हणणे आहे.

प्रसादच्या सवयी न आवडल्याने एके दिवशी जळगावला आलेली प्रिया पुन्हा आपल्या नोकरीच्या गावी निघून गेली. प्रसादच्या आई वडीलांसह त्याच्या बहिणीने तिला फोन करुन तिच्या पतीपासून घटस्फोट घेण्याचा आग्रह धरला. प्रसादचा घटस्फोट झाला असून तु देखील तुझ्या पतीपासून घटस्फोट घे म्हणजे तुमच्या दोघांचा लग्नाचा मार्ग मोकळा होईल असे तिला सांगण्यात आले. न्यायालयीन प्रक्रिया पुर्ण करत पहिल्या पतीपासून प्रिया पुर्णपणे अलिप्त झाली.

विविध वाद विवादांचा टप्पा पार करत काही नातेवाईक व परिचितांच्या उपस्थितीत चोपडा तालुक्यातील एका देवस्थानात दोघांचा विवाह पार पडला. आपल्याला वारंवार सोन्याचे दागिने आणी कपड्यांसह इतर खरेदी करण्यास भाग पाडत लहान सहान गोष्टींसाठी छळ केल्याचे प्रियाचे म्हणणे आहे. एका वेब सिरीजमधे दाखवल्याप्रमाणे आपल्या डोळ्यावर पट्टी आणि हातपाय बांधून प्रसादने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रियाचे म्हणणे आहे. 

आपण गर्भवती असल्याचे प्रियाच्या लक्षात आले. तिने याबाबत प्रसादला सांगितले असता त्याने तिला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास दिल्या. दरम्यानच्या कालावधीत प्रियाची जळगाव येथे बदली झाली. ती जळगाव येथे शासकीय सेवेत रुजू झाली. या कालावधीत प्रियाला प्रसादकडून मारहाण होऊ लागली. घरातील सर्व खर्च करण्यासह मारहाण सहन करण्याच्या प्रकाराला प्रिया वैतागली. प्रसादसह तिच्या आई वडीलांच्या त्रासाला वैतागून ती आपल्या गावी निघून गेली.

आपल्या गावी गेल्यानंतर ती दवाखान्यात दाखल झाली. ती गर्भवती असल्याचे तेथील डॉक्टरांनी तिला सांगितले. त्यामुळे तिने हा प्रकार प्रसादच्या कानावर घातला. मात्र मला हा प्रकार मान्य नाही असे म्हणत या गर्भारपणाची जबाबदारी घेण्यास प्रसादने नकार दिला. अखेर पिडीत प्रियाने अभैदया फाउंडेशन शिक्षणघर आणि गुलाबी गॅंग सखी या संस्थेच्या संचालीका वैशाली झाल्टे यांच्यासह एमआयडीसी पोलिस स्टेशन गाठले. पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक माधुरी बोरसे यांच्यासमक्ष पिडीत प्रियाची कैफीयत घेण्यात आली. पिडीत प्रियाने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस स्टेशनला प्रसाद सुरेंद्र खंडेलवाल, मधुबाला सुरेंद्र खंडेलवाल, सुरेंद्र खंडेलवाल, पुजा संतोष खंडेलवाल, संतोष खंडेलवाल, आरती सुशील खंडेलवाल, सुशील खंडेलवाल अशा सर्व संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा भारतीय न्याय संहिता सन 2023 चे कलम 64, 85, 87, 89, 115, 351 (1), 3 (5) नुसार दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक राहुल तायडे करत आहेत. (या कथेतील पिडीतेचे “प्रिया” हे नाव काल्पनिक आहे.)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment