पतीने केली पत्नीची हत्या? वाशिम येथील घटना

On: September 20, 2020 10:51 PM

वाशिम : शेतात गेलेल्या महिलेची धारदार हत्याराने केलेली निर्घृण हत्या आज वाशिम जिल्ह्याच्या कोळगांव शेतशिवारात उघडकीस आली. कोळगांव येथील सागर किसन मुळे असे मयत महिलेचे नाव असून तिचा हल्लेखोर संशयीत पती किसन कुंडलीक मुळे फरार झाला आहे. काल घडलेली घटना आज सकाळी उघडकीस आली.

सागर मुळे ही महिला शेतात म्हैस चारण्यासाठी गेली होती. तिचा पाठलाग करत पती किसन कुंडलिक मुळे हा कुऱ्हाड घेऊन गेल्याचे त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर व सून शारदा यांनी पाहिले होते. त्यांनी हा प्रकार त्यांचे काका मधुकर मुळे यांना सांगितला होता. सायंकाळ झाली तरी सागर मुळे ही महिला घरी परत आली नव्हती. त्यामुळे तिचा शोध घेण्यात आला.

शेतात कुटूंबातील सदस्यांना फक्त म्हैस एका झाडाला बांधलेली दिसली. सागर मुळे ही मात्र दिसत नव्हती. तसेच तिचा पती किसन मुळे हा देखील फरार होता. कुटुंबातील सदस्यांनी आज पुन्हा तिची शोध मोहीम सुरु केली असता ती शेतात मयत अवस्थेत आढळून आली. तिचय मानेसह पाठीवर शस्त्राच्या जखमा होत्या.

सागर मुळे व तिचा पती किसन मुळे यांच्या नेहमी वाद होत असत. त्यामुळे दोघे विभक्त रहात होते. या प्रकरणी मधुकर मुळे यांच्या फिर्यादीनुसार मालेगाव पोलिस स्टेशनला हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment