भिवंडीत कोसळली तीन मजली इमारत

ठाणे : ठाणे येथील भिवंडी भागातील तिन मजली इमारत आज भल्या पहाटे कोसळली. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. याशिवाय जवळपास 20 ते 25 जण ढिगाऱ्याखाली अडकून पडले असल्याची भिती देखील व्यक्त केली जात आहे. एनडीआरएफच्या जवानांनी 20 जणांना ढिगा-याखालून सुखरुप बाहेर काढले असले तरी देखील अजुन 20 ते 25 जण ढिगा-याखाली अडकले असल्याची भिती व्यक्त केली जात आहे.

भिवंडी येथील पटेल कंपाऊंडमध्ये आज सकाळी ही दुर्घटना घडली. एनडीआरएफ तसेच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य वेगात सुरु आहे. एका लहान मुलास या ढिगा-यातून बाहेर काढले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here