लाच मागणी करणाऱ्या तलाठ्याविरुद्ध गुन्हा 

On: March 26, 2026 8:26 PM

जळगाव – खरेदी केलेल्या शेत क्षेत्राची नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या तलाठ्याविरुद्ध जळगांव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय बिडवे (सजा करंज ता. जि. जळगांव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

तलाठी बिडवे यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम देण्यासाठी तक्रारदार गेले होते. मात्र आपल्या विरुद्ध लाचेचा सापळा रचला जात असल्याचा त्यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी लाचेची रक्कम घेतली नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक स्मिता दत्तात्रेय नवघरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जळगांव तालुका पोलीस स्टेशनला तलाठी बिडवे यांच्याविरुद्ध लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपअधिक्षक योगेश ठाकुर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पो.नि. हेमंत नागरे, पोलिस उप निरीक्षक दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ संगिता पवार, पोना बाळु मराठे, पोकॉ अमोल सुर्यवंशी व प्रणेश ठाकुर आदींनी हा कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment