बांधकाम व्यावसायीकाचा झाला गेम , वर्चस्वाची लढाई सर्वच ठिकाणी सेम

मयत प्रवीन तायडे

नवी मुंबई : अनधिकृत बांधकामांचे माहेरघर म्हणून नवी मुंबई कडे पाहिले जाते. नवी मुंबई येथील बांधकाम व्यवसायातील गुन्हेगारी सर्वश्रृत आहे. बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून निर्माण झालेला वर्चस्ववाद अनेक बिल्डर्सचा खून होण्यास कारणीभूत ठरला आहे. ज्याने या व्यवसायात वचरढ होण्याचा प्रयत्न केला तो संपला असे देखील म्हटले जाते.

नवी मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात लॉकडाऊनची तिव्रता मोठ्या प्रमाणात होती. लॉकडाऊन काळात पोलिस यंत्रणा कोरोना बंदोबस्तात गुंतली होती. या काळात गुन्हेगारी वृत्तीने आपले डोके वर काढले. नवी मुंबईत लॉकडाऊन काळात गोळीबार झाल्याची एक घटना समोर आली. या गोळीबारात दोन संशयित आरोपींनी एकाची डोक्यात गोळी झाडून हत्या केली. या घटनेमुळे नवी मुंबईत प्रचंड खळबळ माजली.

रबाळे परिसरातील बांधकाम मटेरियल सप्लायर प्रवीण तायडे यांचा बांधकाम व्यवसायात दिवसागणीक दबदबा वाढत होता. त्यातच राजकीय वरदहस्त असल्याने प्रवीण तायडे यांची व्यवसायात चलती सुरु झाली होती. ज्यावेळी मनुष्य एखाद्या क्षेत्रात मोठा होऊन मनमानी करू लागतो तेव्हा त्याचे स्पर्धक आणि शत्रू आपसुकच वाढलेले असतात. प्रवीण तायडे यांच्या बाबतीत असाच काहीसा प्रकार झाल्याचे म्हटले जात आहे.  भर दुपारी त्यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दरम्यान फरार आरोपींची ओळख पटली असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. 

रबाळे तळवली या भागात गावठान अनधिकृत इमारतींचे पेव फुटले आहे. जागा मिळेल तिथे अनधिकृत इमारती उभ्या रहात असल्याचे म्हटले जात आहे. पोलीस आणि सिडकोच्या अधिका-यांशी आर्थिक व्यवहार करून या इमारतीचे बांधकाम केले जात असल्याचा जनतेतून आरोप होत आहे. इमारतीच्या बांधकामाला रेती, सिमेंट, विटा, खडी इत्यादी सामान पुरवण्याचे काम प्रविण तायडे करत होते. या व्यवसायात त्यांचे वर्चस्व निर्माण झाले होते.

प्रविण तायडे यांच्या वर्चस्वाला कुणी धक्का देऊ शकत नव्हते. तायडेची आर्थिक ताकद वाढत होती. प्रविण तायडे यांचे राजकीय नेत्यांसोबत चांगले संबंध निर्माण झाले होते. त्यामुळे तायडेचे व्यवसायिक पारडे अधिकच जड झाले होते. त्यामुळे तायडेचा अहंकार देखील वाढला होता असे म्हटले जाते. काही लोकांना त्यांनी दुखावले होते. हेच अज्ञात दुःखी आत्मा त्यांच्या मागे लागले होते. प्रविण तायडे यांच्यासारख्या लोकांच्या जिवाला अधिक धोका असतो. पैशाचा धुर त्यांच्या डोळ्यावर आलेला असतो. आपल्या नादाला कुणी लागणार नाही असा विश्वास त्यांच्यात निर्माण झालेला असतो. बेसावध प्रविण तायडे हे एका साथीदारासमवेत ४ जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास मोटार सायकलवरून कामानिमित्त जात होते. कोरोनाचा पादुर्भाव असल्याने त्यावेळी रस्त्यावरील वर्दळ कमी होती. यावेळी पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनधारकाने त्याच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या धडकेत तायडे खाली पडले. त्यानंतर मारेक-यांपैकी एकाने तायडेंवर अगदी जवळून डोक्यात गोळ्या झाडल्या. मारेकऱ्यांनी हत्या करण्याच्या उद्देशाने केलेल्या गोळीबारात तायडे जागीच ठार झाले. रक्ताच्या थारोळ्यात तायडे पडताच मारेकरी फरार होण्यात यशस्वी झाले.

घणसोली सेक्टर २१ (तळवली) येथे बांधकाम भूखंड विकसित करण्याचे काम मिळविण्याच्या वादातून त्याची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच जुन्या काही गुन्हेगारी प्रकरणात तायडे साक्षीदार असल्याचीही माहिती समोर येत आहे. यामुळे कोणत्या जुन्या वादातून त्याची हत्या झाली आहे का? याचाही तपास रबाळे पोलीस करत आहेत. मात्र मारेक-यांनी तायडे यांची हत्या का केली हे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. बांधकाम साईटवर लागणाऱ्या साहित्यांचा पुरवठा करण्याचा तायडे यांचा व्यवसाय होता. घणसोली, रबाळे आदी ठिकाणी सुरू असलेल्या इमारती, टॉवरच्या बांधकामासाठी ते सप्लायर म्हणून व्यवसाय करत होते. या व्यावसायिक वादातून किंवा पूर्ववैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त पंकज डहाणे, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त प्रवीण पाटील आणि त्यांच्या युनिटच्या पोलिस निरीक्षकांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचा गेल्या महिन्यातील सीडीआर फोनची माहिती घेण्यास सुरूवात केली. दरम्यान या घटनेने बांधकाम व्यावसायीकांमधे खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here