जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

On: March 29, 2026 10:03 PM

जळगाव दि. २९ प्रतिनिधी –  जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स यांच्या प्रायोजकत्वाखाली आयोजित जळगाव क्रिकेट लिग-२०२६,  JCL T-20 क्रिकेटचा महा-थरार सहा संघांमध्ये रंगणार आहे. प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड आणि १९ वर्षाखालील गटातील तब्बल १५६ खेळाडूंवर ऑक्शनमध्ये बोली लागली. यावेळी ऑलराऊंडर खेळाडूंसाठी फ्रॅचायझींमध्ये तुफान चढाओढ पाहायला मिळाली. क्रिकेटप्रेमींसाठी ही लीग एक रोमांचक पर्व ठरणार असून प्रत्येक संघाने ऑलराऊंडर खेळाडूंवर आपली पर्स पॉकेट आजमावून संघ भक्कम केला आहे. ऑक्शननंतर संघांची रचना जाहीर झाली असून प्रत्येक संघात दमदार खेळाडूंचा समावेश आहे.

जैन हिल्सच्या परिश्रम हॉलमध्ये पार पडलेल्या या ऑक्शनमध्ये तांत्रिक बाजू अभंग जैन, जगदीश चावला, वरूण देशपांडे, हितेश पटेल, समीर गुळवे, उदय सोनवणे, संदीप गांर्गुेळे, सुयश बुरूकूल, प्रशांत विरकर व मोहम्मद फजल यांनी सांभाळली. तर ऑक्शनर म्हणून अॅड. सुरज जहॉंगिर यांनी दमदार शैलीत संपूर्ण वातावरण रंगवले.

सहा संघांमध्ये रंगणार क्रिकेटचा थरार..

सुहांस केमिकल्स – अमळनेर जायंटन्स

शुभम शर्मा (आयकॉन), मोहम्मद सैफ, ऋषी यादव, मानव टिबरेवाला, अजय पाटील, यशवंत शिंदे, सतीश चतुर्वेदी, रोहित पारधी, केशव ठाकूर, आर्यन पाटील, निनाद पाटील, रोहित भोई, टिंकू राठोड, जाकीर तडवी, इसरार मोहम्मद, सर्वेश गुळवे, गौरव ठाकूर, सूरज जाधव, राहुल निंभोरे  (प्रशिक्षक)

सागर पार्क सीसी – चाळीसगाव चार्जर्स

ओम मुंडे (आयकॉन), साई बनाईत, साहिल गायकर, लोकेश पाटील, शाहरुख शेख, सुरज पाटील, अमेय कोळी, अभिषेक पाटील, अमेय पवार, मितांशु सोनवणे, प्रणव जाधव, योगेश पाटील, मिलिंद सपकाळे, दिनेश ढाकणे, कार्तिक बाटुंगे, कृष्णा ढगे, वकार शेख, रोशन भडांगे, सचिन सोनवणे  (प्रशिक्षक)

दाल परिवार – जळगाव किंग्स

जगदीश झोपे (आयकॉन), बिपिन चांगरे, राज बेलदार, उबेद खाटिक, मोहम्मद नदिम, मनीष चव्हाण, मेहुल इंगळे, क्रिष धंडोरे, अक्षय मेघानी, पुर्वेश चौधरी, विराज मंधवानी, जितेंद्र नाईक, राकेश बाविस्कर, सागर भावसार, इमरान पठाण, चिन्मय पोळ, गौरव वाघ, सिद्धार्थ तायडे, घनश्याम चौधरी (प्रशिक्षक)

ऋषभ मेटल अॅण्ड केमिकल्स – जामनेर ब्लास्टर्स

शतायू कुलकर्णी (आयकॉन), प्रदयुम्न महाजन, रामकृष्ण गुरुचरण, क्रिषी नथानी, मासूम खाटिक, ललित पाटील, योगेश तेलंग, कुणाल शर्मा, प्रतीक शिंदे, मानस पाटील, विवेक महाजन, नितलेश चौधरी, मयूर चव्हाण, चेतन वानखेडे, अतुल मोरे, रोहन पाटील, वंश पाटील, अर्शद खान, मुश्ताक अली (प्रशिक्षक)

एस. के. ट्रान्सलाईन – पाचोरा टायटन्स

सचिन चौधरी (आयकॉन), पवन पाटील, रोहित तलरेजा, सिद्धेश देशमुख, कैलास पाटील, विशाल शिरसाठ, निलेश एस. पाटील, वीरेन पाटील, कार्तिक मारवाडी, यश अग्रवाल, श्लोक महाजन, राज केसी, निखिल दुरांडे, कैलास पांडे, चारुदत्त नन्नावरे, जय शर्मा, स्वप्निल सुर्यवंशी, प्रतीक पवार, पंकज महाजन (प्रशिक्षक)

एम. व्ही. जे. इंटस्ट्रीयल कन्सलन्टशी – रावेर रॉयल्स

नचिकेत ठाकूर (आयकॉन), अनुज पवार, धवल हेमनानी, सचिन पाटील, नेहल अहमद, संदेश सुरवाडे, सज्जाद अहमद, अक्षय कोल्हे, आर्यन नथानी, मोहम्मद नोमान, आदित्य वाणी, कृष्णा माळी, तौसिफ मिर्झा, प्रज्वल पाटील, सोहम जैन, अशफाक शेख, तनवीर अहमद (प्रशिक्षक)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment