जळगाव : भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशन हद्दीत झालेल्या घरफोडीच्या घटनेचा अवघ्या दोन दिवसात उलगडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरीस गेलेल्या 5 लाख 70 हजार रुपयांच्या सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम अशा स्वरुपाच्या मुद्देमालापैकी 4 लाख 99 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अमीर खान हबीब खान असे चोरट्याचे नाव असून त्याने एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.
पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक राजु सांगळे, पो हे कॉ विजय नेरकर, कांतीलाल केदारे, पो. कॉ. योगेश माळी, भुषण चौधरी, अमर अढाडे, दिलीप कोल्हे, चंद्रकांत रायपुरकर, अक्षय कोतकर, प्रशांत सोनार, जिवन कापडे, जावेद शहा, सचिन चौधरी, महेंद्र पाटील, हर्षल महाजन आदींनी या गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. अधिक तपास पोलिस उप निरीक्षक राजु सांगळे करत आहेत.





