जळगाव – जळगाव विभागाच्या अप्पर पोलिस अधीक्षक पदाची संदीप गावीत यांच्याकडे पदोन्नतीच्या रुपात जबाबदारी येत आहे. तसेच श्रीमती दिपाली खन्ना यांच्याकडे उप आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई (कोकण 2) तर श्रीमती प्रांजली सोनवणे यांची पोलिस अधीक्षक गुन्हे अन्वेशन विभाग अमरावती येथे पदोन्नतीवर वर्णी लागली आहे.
संदीप गावीत यांनी यापूर्वी जळगाव उप विभाग यशस्वी रित्या हाताळला आहे. त्यांना जळगाव जिल्ह्याची चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्याचा जळगाव विभागाला कायदा व सुव्यवस्था राबवण्याकामी चांगला फायदा होणार आहे.






