भिवंडी दुर्घटना : विकासकावर गुन्हा

On: September 22, 2020 11:13 AM

भिवंडी : भिवंडी येथील इमारत कोसळल्या प्रकरणी इमारतीचा विकासक सय्यद अहमद जिलानी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारपोली पोलीस स्टेशनला भा.दं.वि. कलम ३३७, ३३८, ३०४ (२) नुसार जिलानीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेच्या वेळी दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे बचावकार्यात अडथळा आला होता. तथापी जवानांनी भर पावसात देखील आपले बचावकार्य सुरुच ठेवले होते. घटनास्थळी मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया, पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी परिस्थीतीवर नियंत्रण मिळवले होते.

घटनास्थळी बचावकार्य अजूनही सुरुच असून, जखमींवर स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत. इमारत दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment