गादीवरुन उतरण्यास संशयिताचा नकार पोलिसांना सापडली 16 लाखाची रोकड

चाळीसगाव:

चाळीसगाव शहरातील घाटरोड परिसरातील झोपडपट्टीचा परिसर गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध असल्याचे म्हटले जाते. या परिसरातून सलीम नावाच्या संशयितास पकडले असता त्याच्या गादीखालून तब्बल 16 लाख 55 हजार रुपयांच्या नोटा हस्तगत करण्यात आल्या. या घट्नेने शहरातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

चाळीसगाव शहरात काही दिवसांपुर्वी गांजा व रोकडचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. या जप्तीदरम्यान संशयीत सलीम हा गादीवरुन उठण्यास तयार होत नव्हता. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्याच्या गादीखालून लाखो रुपयांच्या नोटा हस्तगत झाल्याने चाळीसगाव शहरात खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे गांजा प्रकरणातील संशयित हा दोन्ही पायांनी अधू आहे.

गांजा विक्रीतील सलीम नावाच्या संशयीतामागे कोणतीतरी शक्ती कार्यरत असल्याचे बोलले जात आहे. सलीम यास जागेवर गांजा आणून दिला जात होता. त्यामुळे सलीमला जागेवर  गांजा आणून देणारा कोण? याची उत्सुकता चाळीसगाव शहरवासियांना लागली आहे.

चाळीसगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथे सन 2004 साली एका अपघातात सलिमचे दोन्ही पाय निकामी झाले. यापुर्वी तो भंगारचा व्यवसाय करत होता. कालांतराने गांजा विक्रीच्या व्यवसायात त्याने आपला विस्तार केला. गांजा विक्रीचा धंद्यातून 15 वर्षात त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे जमले. गेल्या 15 वर्षांपासून तो बसत असलेल्या गादीखाली पैसे ठेवून त्या गादीवरच बसायचा व झोपत होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here