अतिक्रमण विरोधी पथकासोबत हुज्जत : दोघांना अटक

On: September 22, 2020 6:27 PM

जळगाव : जळगाव शहरातील घाणेकर चौकात मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घालणाऱ्या दोघा हॉकर्सवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. दोघा हॉकर्सविरुद्ध शनी पेठ पोलीस स्टेशनला सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील अनधिकृत होर्डिंगसह अनधिकृत अतिक्रमण काढण्याची मोहीम मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या नेतृत्वाखाली आज करण्यात आली. यावेळी काही हॉकर्सने मनपा कर्मचाऱ्यांसोबत हुज्जत घातली होती. काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. हॉकर्सचे साहित्य जप्त करण्यात आले.

यावेळी शेख फारुख शेख यासिन व तौफिक शेख फारुख या दोघांवर शनीपेठ पोलीस स्टेशनला ज्ञानेश्वर कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment