पूनम पांडेच्या पतीला गोव्यात अटक

On: September 22, 2020 8:04 PM

मडगाव : बॉलीवूड सेन्सेशन व सेमी न्यूड पोजेससाठी लोकप्रिय असलेली पूनम पांडे हिने गोव्यात खळबळ माजवली आहे. ती काणकोण येथे शूटिंगसाठी आली होती. त्यावेळी तिचा पती सॅम बॉम्बे याने आपला विनयभंग केला असल्याची तक्रार पूनम हिने केली आहे. पतीविरुद्ध केलेल्या तक्रारीनंतर तिच्या पतीला काणकोण पोलिसांनी अटक केली.

सॅम बॉम्बे या पुनम पांडे याच्या पतीचे मूळ नाव सॅम अहमद असे आहे. तो फिल्म प्रोड्युसर आहे. गेल्या 1 सप्टेंबर रोजी त्याचे पुनम सोबत लग्न झाले होते. लग्नानंतर ते फिल्म शूटिंगसाठी गोव्यात आले होते. पाळोले काणकोण येथे सरोवर या हॉटेलात ते दोघे रहत होते. दरम्यान सॅमने आपल्याला मारहाण व विनयभंग केला असल्याचा तीचा आरोप आहे. काणकोण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी सॅम यास अटक केली असल्याचे म्हटले आहे. पूनम पांडे ही आपल्या हॉट अदाकारी साठी नेहमीच चर्चेत असते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment