अनुराग कश्यपवर बलात्काराचा गुन्हा दाखल

On: September 23, 2020 10:16 AM

मुंबई : चित्रपट निर्माता अनुराग कश्यप विरोधात वर्सोवा पोलीस स्टेशनला लैंगिक अत्याचाराचा गुन्हा मध्यरात्री दाखल करण्यात आला आहे. पीडित अभिनेत्रीने याप्रकरणी लेखी तक्रार दिली होती.

पीडित अभिनेत्रीने अ‍ॅड. नितीन सातपुते यांच्यासोबत वर्सोवा पोलीस स्टेशनला जावून कश्यपविरोधात लेखी तक्रार दिली. त्याच्याविरोधात बलात्कारासह अन्य गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मध्यरात्री उशीरा कश्यपविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अ‍ॅड. नितीन सातपुते यांनी सांगितले आहे.

‘फ्रीडम’ या चित्रपटादरम्यान पीडित अभिनेत्रीची कश्यपसोबत ओळख झाली होती. त्यावेळी तो ‘बॉम्बे वेलवेट’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त होता. त्यावेळी सन २०१४-१५ मध्ये हा प्रकार घडल्याचे तिचे म्हणणे आहे. तिने कुटुंबीय आणि मित्र मैत्रिणीना घडलेल्या प्रकाराबाबत वाच्यता करु नये असा सल्ला तिला देण्यात आला होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment