वहिणीवर अत्याचार करणाऱ्या दिराला अटक

On: September 23, 2020 7:35 PM

जळगाव : सख्ख्या मोठ्या वहिनीवर अत्याचार करणाऱ्या संशयितास एमआयडीसी पोलिसांनी आज बुधवारी नशिराबाद येथून अटक केली. एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीत राहणारा संशयित दिर गेल्या सहा महिन्यापासून पसार झाला होता.

६ मार्च २०२० रोजी सकाळच्या वेळी पीडिता घरात एकटी होती. त्यावेळी तिचा दिर घरात आला. त्याने अचानक दरवाजा बंद करुन तिच्याकडून शरीरसुखाची मागणी सुरु केली. पीडितेने नकार दिल्यानंतर देखील त्याने तिच्यावर अत्याचार केला.

पीडितेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितल्यानंतर संशयित पसार झाला. पिडीतेचा हा दुसरा विवह असून तिला चार वर्षाची मुलगी आहे. दुस-या पतीपासून तिला एक अपत्य आहे. या घटनेनंतर पिडीता औरंगाबाद जिल्ह्यात निघून गेली होती.

या प्रकरणातील संशयित दिर नशिराबाद येथे असल्याची माहिती पोलिस कर्मचारी इम्रान सय्यद यांना समजली. त्या माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, गोविंदा पाटील, इम्रान सय्यद व संदीप पाटील यांच्या पथकाने त्याच्यावर झडप घालून त्याला अटक करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment