खंडणी दिली नाही म्हणून तलवारीने बोटेचं कापली

On: September 24, 2020 9:13 PM

फरीदाबाद : हरियाणातील फरीदाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. खंडणी दिली नाही म्हणून झालेल्या तलवार हल्ल्यात ढाबा मालकाची अंगठ्यासह बोटे छाटली गेली आहेत. जखमी ढाब मालकावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
चंदावली गावातील रहिवासी असलेल्या त्रिलोक यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार ते आपल्या भावासह ढाबा चालवतात. ढाबा बंद करत असतांना काही तरुण त्यांच्या ताब्यातील कारने तेथे आले.

कारमधून मनोज भाटी, अनिल व त्याच्या मोठ्या भावासह 8 ते 10 तरुण खाली उतरले. मनोज भाटी याच्या हातात तलवार होती. अनिलसह त्याच्या भावाच्या हातात रॉड होता. इतर मुलांच्या हातात काठ्या होत्या. मनोज भाटी याने गाडीतून खाली उतरताच त्रिलोकला शिवीगाळ सुरु केली. पुढच्या क्षणाला त्याने हातातील तलवारीने त्रिलोक याच्यावर तलवारीने वार केलं. त्रिलोकने बचावासाठी डोक्यावर हात ठेवताच त्याच्या हाताची बोटे व अंगठा तलवारीच्या हल्ल्यात कापली गेली. ढाबा चालवायचा असेल तर दरमहा पैसे द्यावे लागतील अशी धमकी त्रिलोक यास मिळाली होती. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment