महसूल लिपिक व पंटर एसीबीच्या जाळ्यात

जळगाव : शेतजमीनीच्या उताऱ्यावरील वारसाचे नाव कमी करण्यासाठी अकरा हजार रुपये लाचेच्या रुपात घेतांना चाळीसगाव तहसील कार्यालयातील लिपीकासह पंटर या दोघांना रंगेहाथ अटक करण्यात आली. या घटनेने महसुल प्रशासनात खळबळ माजली आहे.

तक्रारदाराच्या बहिणीच्या नावे असलेल्या शेतजमीनीच्या उताऱ्यावरील वारसाचे नाव कमी करायचे होते. त्या मोबदल्यात चाळीसगाव तहसिल कार्यालयातील प्रशांत किसन सावकारे (लिपीक वर्ग -3) याने संबंधित तक्रारदाराकडून 11 हजार रुपये लाचेच्या रुपात मागितले होते.

तक्रारदाराने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव यांचेकडे लेखी तक्रार दिली होती. त्यानुसार आज सापळा रचला असता लिपीक प्रशांत किसन सावकारे व त्याचा खाजगी पंटर यादव केशव पवार रा.भोजे, ता. पाचोरा यांना 11 हजार रुपये लाचेच्या रुपात घेतांना रंगेहाथ ताब्यात घेत अटक करण्यात आली.

उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निलेश लोधी, रविंद्र माळी, अशोक अहीरे, सुनिल पाटील,सुरेश पाटील, सुनिल शिरसाठ, मनोज जोशी,प्रविण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर यांच्या पथकाने या कारवाईला मुर्त स्वरुप दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here