दिपिका पादूकोण ड्रग चॅट गृपची होती अ‍ॅडमीन

On: September 25, 2020 10:31 PM

मुंबई : दिपिका पादुकोण ला विचारल्या जाणारी प्रश्नावली एनसीबीकडून तयार करण्यात आल्याचे समजते. दिपीका ड्रग चॅट गृपची अ‍ॅडमीन असल्याची माहिती पुढे आली आहे. तिला विचारल्या जाणारे प्रश्न ड्रग चॅट पासून सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे.

शुक्रवारी रकुल हिने एनसीबीच्या प्रश्नांची उत्तरे देताना रियाशी ड्रग चॅट असल्याचे कबूल केले आहे. करिश्माने सांगितले आहे की दिपीका ही ड्रग्स चॅट ग्रुपची ऍडमिन होती. दिपीकाचे नाव चौकशीत पुढे आल्यामुळे तिची चौकशी शनिवारी होणार आहे.

एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिपीका पादुकोन हिस पुढील प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. नैराश्याला बळी पडल्यानंतरच दीपिकाने ड्रग्ज घेण्यास सुरुवात केली होती का? दीपिकाने क्वानच्या मॅनेजर करिष्माशी संपर्क साधला होता का? करिश्मासोबत नैराश्याविषयी बोलताना दिपीका ड्रग्जच्या आहारी गेली का? दिपिकाला बॉलिवूड पार्ट्यांकडून ड्रग्ज घेण्याची सवय लागली का? दीपिका पादुकोणला ड्रग्स कुठून मिळत होते? तिला प्रत्येक वेळी क्वानच्या मॅनेजरकडून ड्रग्ज मिळत होते का?दिपिकाच्या संपर्कात ड्रॅग पेडलर आला होता का? बॉलिवूडमध्ये बऱ्याच पार्ट्यांमध्ये ड्रग्ज जास्त प्रमाणात घेतली जातात, मग दीपिकाच्या दुस-या ड्रग्ज पार्टनरचे नाव काय आहे? दीपिकासमवेत या ड्रग्जच्या जाळ्यात इतर कोणकोणते सेलिब्रिटीज आहेत?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment